‘मार्केट डिमांड’नुसार देशी वांग्यांची शेती

देशी वांग्याला अस्सल चवअसल्याने ग्राहकांकडून त्यास पहिली पसंती असते. त्या दृष्टीने नेलकरंजी(जि. सांगली) येथील सुखदेव धोंडिराम भोसले सहा- सात वर्षांपासून देशी वांग्याची शेती यशस्वी करीत आहेत. स्वतःकडील बियाणे वापरून एप्रिल व ऑक्टोबर अशा दोन लागवड हंगामांची निवड करून त्यातून आपले अर्थकारण त्यांनी मजबूत केले आहे.
Sukhdev Bhosale has continued to grow brinjal in two seasons.
Sukhdev Bhosale has continued to grow brinjal in two seasons.

देशी वांग्याला अस्सल चव असल्याने ग्राहकांकडून त्यास पहिली पसंती असते. त्या दृष्टीने नेलकरंजी (जि. सांगली) येथील सुखदेव धोंडिराम भोसले सहा- सात वर्षांपासून देशी वांग्याची शेती यशस्वी करीत आहेत. स्वतःकडील बियाणे वापरून एप्रिल व ऑक्टोबर अशा दोन लागवड हंगामांची निवड करून त्यातून आपले अर्थकारण त्यांनी मजबूत केले आहे.     सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा दुष्काळी तालुका आहे. मात्र प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात शेती पिकविण्याची जिद्द इथल्या शेतकऱ्यांमध्ये दिसून येते. याच तालुक्यातील नेरकरंजी हे गाव दुष्काळातून सुटलेले नव्हते. एकेकाळी पाणीटंचाई जाणवत असल्याने माळरान हिरवं दिसणं कठीण अशी परिस्थिती होती. पण अलीकडील वर्षात तालुक्यात टेंभू उपसा सिंचन योजनेचं पाणी आलं आणि परिस्थिती बदलू लागली. माळरान हिरवं झालं. डाळिंबासोबत रसाळ द्राक्ष पिकू लागली. भोसले कुटुंब रमले वांगे शेतीत  नेलकरंजी गावातील सुखदेव धोंडिराम भोसले या कुटुंबाने देखील दुष्काळी परिस्थितीशी सामना केलेला होता. निराश न होता मोठ्या हिमतीने तेही शेती पिकवीत होते. सन १९८४ पासून डाळिंब घेत होते. पण तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव झाला अन २०११ च्या दरम्यान बाग काढून टाकावी लागली.आर्थिक परिस्थितीची तशी बेताचीच. पोटाची खळगी भरण्याइतपत पैसा येत होता. त्यामुळे शिक्षण पूर्ण करता आलं नाही. अशा परिस्थितीतून पुढे येत त्यांनी मोठ्या कष्टाने व्यावसायिक पिकांची निवड करून त्यात यश मिळवले आहे. बंधू पांडुरंग भोसले व पुतणे प्रशांत आणि प्रमोद यांची मोठी साथ सुखदेव यांना मिळते. विभक्त कुटुंब असले तरी शेती सगळे एकत्रच करतात ही समाधानाची बाब आहे. त्यांची एकूण १२ एकर शेती आहे. पैकी वांगी एक ते दीड एकर असते. द्राक्ष व कांदा प्रत्येकी एक एकरांत असतात.   पहिल्यापासूनच ‘तरकारी’चा नाद टेंभू उपसा सिंचन योजनेचा मुख्य कालवा नेलकरंजी गावातूनच पुढे आटपाडीकडे गेला आहे. त्याच कालव्याचे पाणी सोलापूर जिल्ह्यात पोचले आहे. शाश्‍वत पाणी मिळाल्याने गावात बागायतीचे क्षेत्र वाढले. अनेक शेतकरी भाजीपाल्यासारखी पिके घेऊ लागले. सुखदेव सांगतात की वडील पूर्वी वांग्याची शेती करायचे. त्यांच्याकडूनच तरकारी पिकविण्याचा नाद लागला. कधी कोंथिबीर, कधी कांदा अशी पिके घेऊ लागलो. पण त्यातला पुरेसा अभ्यास नव्हता. त्यामुळे अडचणी येत होत्या. पण जिद्द हारलो नाही. ज्ञान वाढवले. गावातील मित्र विलास देशमुख यांचे वांग्यासाठी मार्गदर्शन मिळाले. पुतण्यांचाही चांगला अभ्यास झाला. मग लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे तंत्र आत्मसात होऊ  लागले.   देशी वांग्याची निवड देशी वांग्याची चव अस्सल असल्याने ग्राहकांकडून त्यास पहिली पसंती असते. भोसले यांनी म्हणूनच या वांग्याची निवड केली आहे. त्यांना दरवर्षी बियाणं विकत आणावं लागत नाही. घरीच रोपवाटिका तयार करून गरजेनुसार रोपांची निर्मिती करतात. एकरी दोन हजारांपर्यंत रोपे लागतात. बियाणं तयार करण्यासाठी पिकलेल्या वांग्याची निवड केली जाते. बियाणे वेगळे केले जाते.  जोडीला कांद्याची रोपनिर्मितीही करतात. वांग्यासह त्या रोपांचीही पंचक्रोशीत विक्री करतात. त्यातून अधिकचा पैसा मिळतो. लागवडीचे नियोजन  प्रमोद सांगतात, की चुलत्यांच्या प्रोत्साहनामुळे आमचाही वांगे शेतीतील रस वाढला आहे. बाजारपेठेतील मागणी अभ्यासून आम्ही हंगामांची निवड करतो. त्यानुसार लागवडीचे नियोजन करतो. पहिला प्लॉट संपण्याआधी दुसरा प्लॉट लावला जातो. त्यामुळे बाजारात तयार केलेली विक्रीची साखळी तुटली जात नाही. पहिली लागवड एप्रिलमध्ये होते. जूनच्या दरम्यान उत्पादनास सुरुवात होते. हा प्लॉट पुढे नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत चालतो. हा सणासुदीचा काळ असल्याने दर चांगले मिळतात. दुसरा हंगाम ऑक्टोबरमध्ये घेतला जातो. डिसेंबरला तो सुरू होतो. एप्रिलपर्यंत चालतो. ठळक बाबी 

  • बेड (वाफा) पद्धतीचा वापर
  • दोन ओळींतील अंतर ८ फूट व दोन रोपांतील अंतर अडीच फूट. 
  • ठिबक सिंचनाचा वापर. दरवर्षी एकरी चार ट्रॉली शेणखत व एक ट्रॉली कोंबडीखताचा वापर. 
  • शेण, गोमूत्र, बेसन आदींची स्लरी तयार करून महिन्यातून एकदा वापर. त्यामुळे वांग्याचा दर्जा चांगला तयार होतो. 
  • हवा खेळती आणि चांगला सूर्यप्रकाश मिळाल्याने फुटवे वाढण्यास मदत.
  • वांग्याला काढणीच्या वेळेसच जास्त मजूर लागतात. मात्र घरच्यांच्या श्रमातून हे काम सुकर होतं.  
  • दररोज १० ते १२ क्रेट (प्रति क्रेट १७ ते १८ किलो) काढणी होते. 
  • प्रति किलोस २०, २५ रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत दर मिळतो. 
  • उन्हाळ्यात दर तुलनेने कमी. मात्र किडी-रोगांचे प्रमाण कमी असते. 
  • दोन्ही हंगामांतून खर्च वजा जाता सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.  
  • बाजारपेठ  सुखदेव म्हणाले, की तालुक्यासह खानापूर तालुक्यातील गावांमध्ये आठवडी बाजार भरतात. त्या वेळी या वांग्यांना चवीसाठीच चांगली मागणी असते. त्याचा रंग निळसर असतो. ग्राहकांसाठी दर प्रति किलो ४० ते ४५ रुपये दर असतो. मात्र आम्ही थेट विक्री न करता व्यापाऱ्यांना माल देतो. वांग्याची सौद्यातही विक्री होते. मात्र तेथेही माल पाठवत नाही.  - सुखदेव भोसले,  : ७७५५९४९००५, ८५३०७१३४४०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com