Monsoon Update
Monsoon Update Agrowon
ताज्या बातम्या

El Nino IMD: एल-निनोची भीती पसरवू नका, आताच कमी पावसाचा अंदाज बांधणे चुकीचे; हवामानतज्ज्ञांचे मत

Team Agrowon

El-Nino IMD यंदा एल-निनो येणार असल्यामुळे दुष्काळ (Drought) पडेल, असे भाकित आताच वर्तवणे योग्य ठरणार नाही, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. एल-निनोचा भारताली पावसावर (Rainfall) नेमका किती परिणाम होईल, याबद्दल आताच अंदाज बांधणे घाईघाईचे ठरेल, असे त्यांचे मत आहे.

गेल्या काही दिवसांपासून एल-निनोची जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाच्या मॉन्सून हंगामात (Monsoon Season) एल-निनोचा प्रभाव राहील, असा अंदाज अमेरिकेतील काही हवामान संस्थांनी व्यक्त केला आहे. भारतातील काही हवामान संस्थांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे

एल- निनो सक्रिय झाल्यास त्याचा परिणाम म्हणून जगभर तापमान वाढेल तसेच पावसाचं प्रमाण कमी होऊ शकेल, असा अंदाज जागतिक हवामान संघटनेनेही नुकताच व्यक्त केली आहे.

त्याआधी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी- IMD) मार्च महिन्याचा हवामान अंदाज जाहीर केला. त्यामध्ये मार्च ते मे महिना तापमानवाढीचा तसेच उष्णतेच्या लाटांचा ठरणार असल्याचा इशारा दिला होता.

एल निनो म्हणजे काय?

प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो, तेव्हा पश्चिमेकडून पूर्व दिशेस वारे वाहतात. त्यासोबत बाष्पाने भरलेले ढग तिकडे वाहून जातात. त्यामुळे पश्चिमेकडील भागात दुष्काळ पडतो तर पूर्वेकडील भागात अतिवृष्टी होते.

थोडक्यात यंदा एल-निनो हा घटक सक्रिय राहिला तर भारत आणि आशिया खंडातील इतर देशांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील. तर अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना इत्यादी भागांत अधिक पाऊस होईल, असे बोलले जात आहे.

परंतु एल निनो विकसित होण्याची शक्यता वर्षांच्या पहिल्या सहामाहीमध्ये कमी असते. एप्रिल ते जूनमध्ये ती सुमारे १५ टक्के, तर मे ते जुलै दरम्यान ती ३५ टक्के पर्यंत वाढते, असे जागतिक हवामान संघटनेने सांगितले आहे.

जून ते ऑगस्ट या कालावधीसाठी वर्तवण्यात आलेला अंदाज पाहता एल निनो विकसित होण्याची शक्यता ५५ टक्क्यांपर्यंत आहे; मात्र मध्ये येणाऱ्या संभाव्य वातावरणीय अडथळ्यांचा परिणाम होऊन ही परिस्थिती बदलणेही शक्य आहे, असे हवामान संघटनेने आपल्या अंदाजात नमूद केले आहे.

एल निनो आणि हवामान बदलांच्या परिणामांतून संपूर्ण जगासाठी २०१६ हे आजपर्यंत नोंदवण्यात आलेले सर्वात उष्ण वर्ष असल्याचे संघटनेने म्हटले आहे. आगामी काळात २०२६ हे त्याच कारणांमुळे सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यताही संघटनेने वर्तवली आहे.

भीती पसरवू नकाः केळकर

या पार्श्वभूमीवर दैनिक लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांनी मात्र सबुरीचा सल्ला दिला आहे.

भारतातील र्नैऋत्य मोसमी पावसावर एल- निनो परिणाम करेल का, याबद्दल आताच काही भाष्य करणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

एल- निनोच्या प्रभावाबाबत आताच काही भाष्य करणे घाईघाईचे ठरेल, त्यामुळे विनाकारण लोकांमध्ये भीती निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच आजपर्यंत एल निनो जेवढ्या वेळा सक्रिय झाला त्यांपैकी सुमारे निम्म्या वेळा एल निनो हे भारतातील र्नैऋत्य मोसमी पावसासाठी पोषक ठरला.

ला- निना तर नेहमीच भारतातील पर्जन्यमानासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय हवामानशास्त्र विभागा एप्रिल महिन्यात मॉन्सूनबद्दलचा पहिला अंदाज जाहीर करेल. तोपर्यंत वाट बघितली पाहिजे, असे डॉ. केळकर म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT