Snails Agrowon
ताज्या बातम्या

Snails Damage Crops : बार्शीत सोयाबीन पिकांत शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव

Snails in Soybeans : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात शंखी गोगलगायमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. उगवून आलेल्या कोवळ्या सोयाबीन पिकाला गोगलगाय खावून टाकत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. तर काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.

Team Agrowon

Snail Attack On Soybean : घोळवेवाडी (ता. बार्शी) शिवारात सोयाबीनच्या शेतात शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव दिसून येत असून, यावर वेळेत उपाययोजना केल्या तरी प्रादुर्भाव आटोक्यात येईल. गोगलगायींचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रास कृषी पर्यवेक्षकांसह कृषी सहायकांनी भेट देऊन शेतकऱ्यांना गोगलगाय प्रादुर्भावाबाबत मार्गदर्शन केले.

मागील वर्षीही शंखी गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याच संकटाने या वर्षीही तोंड वर काढले आहे. पांगरीपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर डोंगर माथ्यावर वसलेले घोळवेवाडी गाव आहे. या गावाची हद्द धाराशिव जिल्ह्यालगत आहे. शेतकऱ्यांनी कष्टाच्या जोरावर शेतातील दगडाचे ढिगारे बाजूला करून जमीन सुपीक करण्यावर भर दिला आहे.

यावर्षी पावसाने ओढ दिल्याने तब्बल महिना ते दीड महिना खरीप पेरणीस उशीर झाला आहे. नुकताच मागील आठवड्यात या परिसरात पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनसह अन्य पिकांची पेरणी केली. त्यात मंगळवारी (ता. १८) दिवसभर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी झाल्याने पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. पिके दिसू लागताच शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला आहे. कृषी विभागाने प्रादुर्भावग्रस्त भागास प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक महेश गवारे, कृषी सहायक अतुल जगताप, मदन तांबारे, संदीप झाडके, सोनाली शिंदे उपस्थित होत्या.

...असे मिळवा नियंत्रण

शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव दिसून येत असलेल्या परिसरात सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगाय गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात टाकाव्यात. गोगलगायी गोळा करताना शेतकऱ्यांनी हातमोजे वापरावेत व तोंडावर मास्क घालावा. शेतात २५ फुटांवर गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून ठेवावे. त्या ठिकाणी आश्रयास आलेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात नष्ट करावीत. चुन्याच्या भुकटीचा चार इंच रुंदीचा पट्टा शेताच्या चारही बाजूंनी टाकावा. वरील उपाययोजना करूनही गोगलगायींचा प्रादुर्भाव कमी होत नसेल तर रासायनिक उपाय मेटाल्डिहाइड पाच टक्के एकरी दोन किलो पसरून द्यावा. त्यामुळे गोगलगायींवर नियंत्रण मिळवणे शक्य होते, असा उपाय कृषी विभागाकडून सुचवण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT