Raigad News: शेतकऱ्यांच्या मागणीनंतर जिल्ह्यात ४६ भात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, मात्र भातातील आर्द्रतेच्या निकषामुळे अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, कारण सातबारा आधार कार्डशी लिंक करणे आणि बॅंक खात्याशी लिंक करण्याबरोबरच केवायसीची प्रक्रिया शेतकऱ्यांना तापदायक ठरत आहे. जिल्ह्यातील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही..यंदा ८० टक्के भात परतीच्या पावसात भिजलेले होते. ते अद्याप व्यवस्थित सुकवता आलेले नाहीत, त्यामुळे इच्छा असूनही भात विकता येणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर सायंकाळी केंद्र बंद झाल्यानंतर आणलेल्या भाताची जबाबदारी पूर्णपणे शेतकऱ्याला घ्यावी लागणार आहे..Paddy Procurement: भात खरेदी केंद्रे कधी सुरु होणार?; व्यापाऱ्यांकडून दर पाडून खरेदी.नोंदणीला अडथळाकोकणातील बरेचसे शेतकरी हे अल्पभूधारक आहेत, प्रत्यक्ष भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन नसल्याने हमीभाव खरेदी केंद्रावर त्याचा भात खरेदी केला जात नाही. हमीभाव भातखरेदी केंद्रावर भात विकताना शेतकऱ्यांना अनेक जाचक अटींचा सामना करावा लागतो. .Paddy Procurement : रायगड जिल्ह्यात ३८ भात खरेदी केंद्रे सुरू.भातविक्रीसाठी केंद्रावर न्यायचे असेत तर नोंदणी शेतकऱ्यांना ऑनलाइन करावी लागत आहे. केवायसी पूर्ण नसेल, तर ऑनलाइन विक्री करता येत नाही. जमिनीचा सातबारा उतारा आणि बँक पासबुक आणि आधार कार्ड सादर करावे लागते. सातबारा उतारा नावे नसल्याने नोंदणीदेखील करू शकत नाही. मागील काही वर्षांपासून या अटी घालण्यात आल्या आहेत, परंतु यंदा अंमलबजावणी अधिक कडक करण्यात आली आहे..भिजलेल्या भाताचे पंचनामे व्यवस्थित झालेले नाहीत, हे भात अद्याप व्यवस्थित वाळवताही आलेले नाही. त्यामुळे त्याची विक्री करताना जास्त अडवणूक होण्याची शक्यता आहे. हमीभाव केंद्रावर भात विकण्यासाठी सरकारने कागदपत्रांची जी अट घातली आहे ती अडचणीची ठरते आहे. कारण जमिनीचा मूळ मालक आणि उत्पादन घेणारा दोघेही वेगळे असतात. त्यामुळे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला भात विकता येत नाही त्यामुळे शासनाने सातबारा उताऱ्याची अट रद्द करावी.- सतीश भाटकर, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.