Green Chili Agrowon
ताज्या बातम्या

Green Chili : मिरचीला ना फूल लागले ना फळ

यंदाच्या हंगामात या तालुक्यात एका नामांकित कंपनीकडून शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची मिरची रोपे पुरवण्यात आल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा ः सिंदखेडराजा तालुक्यात दरवर्षी मिरची लागवड (Chili Cultivation) करीत हजारोंचे उत्पादन (Chili Production) अनेक शेतकरी घेतात. परंतु बियाणे कंपन्या (Seed Company) आता चलाखी करून शेतकऱ्यांना फसवू लागल्या आहेत. यंदाच्या हंगामात या तालुक्यात एका नामांकित कंपनीकडून शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची मिरची रोपे (Inferior Chili Plant) पुरवण्यात आल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

झाडांवर अनेक दिवस लोटूनही फूल किंवा फूल, फळ धारणा झालेली नाही. यामुळे काहींनी मिरची उपटूनही टाकली. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, तसेच संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली.

या बाबत शेतकऱ्यांनी कंपनी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. परंतु हे अधिकारी एकमेकांवर चालढकल करीत आहेत. अखेरीस शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत मेहकर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तालुका तक्रार निवारण समितीने शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मिरची पिकाची पाहणी केली. रोपांमध्ये दोष असल्याने पिकाची वाढ झाली नाही.

परिणामी फळधारणाही नाही. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे मत समितीनेही मांडले. उपविभागीय अधिकारी ए. के. मिसाळ, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी. जायभाये, तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड, पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी अंकुश म्हस्के, कृषिविस्तार अधिकारी डी. एस. दराडे आदी या पथकात होते.

सिंदखेडराजा तालुक्यात दरेगाव येथील शालीग्राम गाडे, शिवाजी काळे, भागवत बंगाळे, जगन्नाथ बंगाळे, प्रल्हाद काळुसे, रामकिसन वायाळ यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी जालना येथील एका कंपनीमार्फत नवतेज व वैष्णवी या वाणाच्या रोपांची मागणी केली होती. त्यांना ही रोपे पुरवण्यात आल्यानंतर १५ जुलैदरम्यान लागवड केली. त्यानंतर बरेच दिवस लोटूनसुद्धा रोपांची वाढ झाली नाही. त्यावर ना फूल धारणा झाली ना मिरची लागली.

माझ्यासह अनेक शेतकऱ्यांनी या कंपनीकडून रोपे घेतली. मला रोपांसाठी १२ हजार रुपये कंपनीला द्यावे लागले. त्यानंतर फवारणीवर हजारोंचा खर्च झाला. आमच्या भागात किमान एक लाख रोपे शेतकऱ्यांनी घेतले आहेत. लावलेला एक रुपयाही निघाला नाही. कंपनीकडे संपर्क केला तर अधिकारी एकमेकांवर ढकलत आहेत. कृषी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा दिला आहे. त्यानुसार आम्ही ग्राहक मंचात जाऊ. कंपनीविरुद्ध उपोषण करू.
शालिकराम गाडे, मिरची उत्पादक, दरेगाव ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.
शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार तालुका समितीने पाहणी केली. मिरचीची वाढ झालेली नाही. तसेच त्यावर कुठलेही फूल, फळे दिसली नाहीत. या बाबत संबंधितांना तातडीने नोटीस देऊन सुनावणी ठेवणार आहोत. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून देण्याची संबंधित कंपनीची जबाबदारी आहे. त्यांनी सहकार्य न केल्यास प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करू.
वसंतराव राठोड, तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT