Red Chili Rate : सोलापुरात लाल मिरचीच्या दराचा ठसका वाढला

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लाल मिरचीला चांगलाच उठाव मिळाला. तसेच दरही वधारलेले राहिले.

Red Chilies Market | Agrowon

मिरचीला प्रतिक्विंटलला कमाल १८ हजार ५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

Red Chillies | Agrowon

बाजार समितीच्या आवारात गेल्या आठवड्यात लाल मिरचीची आवक प्रतिदिन तीन ते पाच क्विंटल अशी जेमतेम राहिली. पण मागणीमध्ये सातत्य राहिल्याने दर मात्र चांगलेच वधारले.

Chilies Market | Agrowon

लाल मिरचीची आवक प्रामुख्याने जिल्ह्यातील विविध भागातूनच होतेच, पण सर्वाधिक आवक कर्नाटकातील विजापूर, इंडी, गुलबर्गा या भागातून होते. 

Chilies | Agrowon

पण गेल्या महिना-दीड महिन्यापासून आवकेत सातत्याने घट होत आहे. मूळात गेल्यावर्षी मिरचीची लागवड कमी झाली.

Chilies | Agrowon

गेल्या पंधरवड्यापासून तर मागणी आणि आवकेतील तूट वाढत आहे. त्यामुळे दरात तेजी वाढत आहे. 

Chilkies | Agrowon

गतसप्ताहात मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १० हजार रुपये ५०० रुपये, सरासरी १२ हजार ५०० रुपये आणि सर्वाधिक १८ हजार ५०० रुपये इतका दर मिळाला.

Chilies | Agrowon

त्याशिवाय लसूण, कांद्याचे दर मात्र काहीसे स्थिर राहिले. लसूण आणि कांद्याची आवक मात्र वाढली. लसणाची प्रतिदिन किमान १०० ते २०० क्विंटल आणि कांद्याची १०० गाड्यांपर्यंत आवक राहिली. 

Onion Market | Agrowon

लसणाला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, कांद्याला किमान १०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला.

Garlic Market | Agrowon
cta image | Agrowon