Fertilizer Use Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Management : काटेकोर खत व्यवस्थापनातून पीक उत्पादनवाढ, मृदा आरोग्य सुधारणा

Soil Health : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीत सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी होत आहे. तसेच सेंद्रिय कर्ब कमी होत असल्याने त्याचा परिणाम मृदा आरोग्यावर होत आहे.

Team Agrowon

Nashik News : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीत सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी होत आहे. तसेच सेंद्रिय कर्ब कमी होत असल्याने त्याचा परिणाम मृदा आरोग्यावर होत आहे. त्यामुळे पिकांसाठी योग्य खतांची निवड करून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर अचूक करण्याची गरज आहे.

मका, सोयाबीनसारख्या पिकात वेळापत्रक तयार करून काटेकोर नियोजन केल्यास उत्पादन वाढ व मृदा आरोग्य सुधारणा असे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा सल्ला कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे कृषीविद्यावेत्ता डॉ. विक्रम कापसे यांनी दिला.

‘ॲग्रोवन’ व ‘कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. १९) निफाड उपबाजार आवारातील सभागृहात ‘ॲग्रो संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘मका व सोयाबीन पीक खत व्यवस्थापन’ या विषयावर डॉ. कापसे यांनी मार्गदशर्न केले.

या वेळी व्यासपीठावर कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे सहयोगी उपाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख निकेष बैद्य, प्रसिद्धी व्यवस्थापक अमित जैन, सहायक व्यवस्थापक (वित्त) दीपक पांडे, विपणन अधिकारी अमित खांदे, के. के. वाघ कृषी महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक तुषार उगले आदी उपस्थित होते.

या वेळी प्रा. उगले यांनी जैविक पद्धतीने किडनियंत्रणावर भर देण्याचा सल्ला दिला. अमित जैन यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक निकेश वैद्य यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT