Fertilizer Management : केळी पिकाच्या सिंचनासह खत व्यवस्थापनावर द्या भर

राज्यातील मागील काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तर काही भागांत वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे.
Banana
BananaAgrowon
Published on
Updated on

Banana Management : राज्यातील मागील काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तर काही भागांत वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे.

या सर्व अचानक बदलत्या हवामानाचा केळी पिकावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी बागेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

- सध्या मृगबाग काढणीच्या अवस्थेत आहे. घडांची काढणी व हाताळणी काळजीपूर्वक करावी. योग्य पक्वतेच्या घडांची काढणी शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावी. घडांची काढणी केल्यानंतर ते अलगत मातीसोबत संपर्क न होऊ देता पॅकिंग शेडमध्ये आणावेत.

- काही ठिकाणी उशिरा लागवड केलेल्या मृगबागेतील निसवण सुरू असेल. घडाच्या गुणवत्ता वाढीसाठी केळफूल व शेवटची फणी कापल्यानंतर, घडांवर पोटॅशिअम डायहायड्रोजन फाॅस्फेट (०.५ टक्का) ५ ग्रॅम अधिक युरिया (१ टक्का) १० ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून स्टिकरसह फवारणी करावी. या फवारणीनंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

- तीव्र सूर्यप्रकाश, धूलिकण, पानांचे घर्षण यापासून घडांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतात. घडांचे संरक्षण घड ६ टक्के सच्छिद्रतेच्या पाॅलिथिन पिशवीने झाकून घ्यावेत.

Banana
Banana Market Rate: जळगावात केळीची कमी दरात खरेदीप्रकरणी कारवाईचा इशारा

- केळी पिकास सोटमूळ नसते. केळीला येणारी तंतूमय मुळे जमिनीच्या वरच्या थरात येतात. त्यामुळे वाऱ्यांमुळे केळी झाडांचे मोठे नुकसान होते. झाडांना पाॅलिप्राॅपिलीनच्या पट्ट्या किंवा बांबूच्या साह्याने आधार द्यावा.

- बागेभोवती वारारोधक कुंपण म्हणून शेवरी लागवड फायदेशीर ठरते. शेवरी लागवड केली नसल्यास, वारारोधक कुंपण म्हणून शेडनेटचा वापर करावा.

- जून- जुलै लागवडीच्या बागेला प्रति दिन प्रति झाड १८ ते २० लिटर, ऑक्टोबर लागवडीस ९ ते ११ लिटर तर फेब्रुवारी- मार्च लागवडीतील बागेस ४.५ ते ६.५ लिटर पाणी द्यावे.

- जून, ऑक्टोबर व फेब्रुवारी या सर्वच लागवडीमध्ये ऊसाचे पाचट, गव्हाचे काड किंवा हरभऱ्याचा भुस्सा यांचे आच्छादन करावे. तसेच झाडांवर केओलीन ८० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

खत व्यवस्थापन

- ऑक्टोबर लागवडीच्या बागेमध्ये जमिनीद्वारे युरिया ३६ किलो तर ठिबक सिंचनाद्वारे युरिया ५.५ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश ७ किलो प्रति १००० झाडे याप्रमाणात द्यावे.

- फेब्रुवारी लागवडीस प्रति १ हजार झाडांना जमिनीतून युरीया ८२ किलो, तर ठिबक सिंचनाद्वारे युरिया ५.५ किलो, मोनोअमोनिअम फाॅस्फेट ४.६५ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ३ किलो प्रमाणे द्यावे.

Banana
Banana Export : निर्यातीच्या केळीला सरासरी २००० रुपये दर शक्य

नवीन लागवडीचे नियोजन

- नवीन केळी लागवडीचे नियोजन हे साधारणपणे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात किंवा जूनमध्ये करावे. लागवड गादीवाफ्यावर करावी.

- लागवडीसाठी वेळेवर उती संवर्धित रोपांची उपलब्धता होईल असे नियोजन करावे. जेणेकरून कुकुंबर मोझॅक (सीएमव्ही) या विषाणूजन्य रोगाला अटकाव घालता येईल.

- केळी लागवडीवेळी बागेभोवती वारारोधक कुंपण म्हणून शेवरीची लागवड करावी.

संपर्क - डॉ. चंद्रशेखर पुजारी, ९४२०९४३१४६, ०२५७-२२५०९८६, (अखिल भारतीय समन्वयीत फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com