Water Storage Agrowon
ताज्या बातम्या

Dara Water Project : दरा मध्यम प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ

Dam Water Storage : प्रकल्पात १०० टक्के क्षमतेने पाणीसाठा झाला असून, पुढील काही तासांत दरा प्रकल्पाच्या सांडव्यावरून केव्हाही पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो.

Team Agrowon

Shahada News : दरा (ता. शहादा) येथील मध्यम प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, सद्यःस्थितीत पाणी पातळीची ३०९.२० मीटर नोंद झाली आहे.

प्रकल्पात १०० टक्के क्षमतेने पाणीसाठा झाला असून, पुढील काही तासांत दरा प्रकल्पाच्या सांडव्यावरून केव्हाही पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो. यासाठी प्रशासनातर्फे वाकी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तालुक्यातील दरा मध्यम प्रकल्पाचा पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरले असल्याचे नंदुरबार मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता तु. प्र. चिनावलकर यांनी पत्राद्वारे कळविले असून, प्रकल्पाच्या सांडव्यावरून कधीही पाण्याच्या विसर्ग होऊ शकतो.

यासाठी वाकी नदीकाठावरील वीरपूर, रामपूर, फत्तेपूर, शिरूड त. हवेली, कानडी त. हवेली, चिखली, औरंगपूर, कोठली त. हवेली, परिवर्धा, वैजाली, नांदर्डे आदी गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडण्यात येऊ नये व कोणत्याही मनुष्याने नदीपात्रात जाऊ नये, तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी

दरा प्रकल्पातून वाकी नदीत पाणी सोडण्याअगोदर नदीकाठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना कर्मचाऱ्यांमार्फत देण्यात आल्या आहेत.
- दीपक गिरासे, तहसीलदार, शहादा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT