Ratnagiri Rain News : मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात आठवडाभरापासून पावसाला सुरुवात झाली; परंतु अजूनही पावसाला अपेक्षित जोर नसल्याने जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या धरणाच्या पाणीपातळीत फारशी वाढ झालेली नाही.
तीन मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १.७०३ दशलक्ष घनमीटर ०.८०२ या दरम्यान पाणीसाठ्यात वाढ झाली आहे तर लहान धरणांमध्ये अजून ‘जैसे थे’ परिस्थिती असून एकूण पाणीसाठा ३६.५२ टक्केच आहे. धरणक्षेत्रांमध्ये कमी पर्जन्यमान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
पाणीटंचाईचा दाह सर्वांनाच सोसावा लागला. त्यात अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. उष्म्यामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन पाणीसाठ्यात घट होत होती. त्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती;
मात्र चक्रीवादळामुळे वारंवार मॉन्सूनला पोषक असलेले वातावरण मागे सरत असल्याने पूर्ण जून महिना संपत आला तरी पावसाची प्रतिक्षाच होती. जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांमध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत किंचित वाढ झाली आहे.
नातूवाडी धरणामध्ये १.७०३ दशलक्ष घनमीटर, गडनदी ०.२४२ तर अर्जुना ०.८०२ दशलक्ष घनमीटर साठा वाढला आहे. तर जिल्ह्यातील ४६ लहान धरणांमध्ये गेल्या आठवड्यात ८७.६३ दशलक्ष घनमीटर साठा होता. आज हाच साठा ८३.७९ दशलक्ष घनमीटर आहे.
आठवडाभर पाऊस पडूनही धरणांच्या पाणीपातळीत थोडीशीही वाढ झालेली नाही. अर्थात, धरणक्षेत्रामध्ये पाऊसच नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.