Akola Water Stock : अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २९ टक्के जलसाठा

Water Stock Update : यंदाच्या पावसाळ्यातील पहिला जून महिना कोरडा गेल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठा वेगाने कमी होत आहे.
Water Stock
Water Stock Agrowon
Published on
Updated on

Akola News : यंदाच्या पावसाळ्यातील पहिला जून महिना कोरडा गेल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठा वेगाने कमी होत आहे. बहुतांश प्रकल्पात महिना ते दीड महिना पुरेल इतकाच साठा असल्याचे स्पष्ट आहे.

अकोला जिल्ह्यातील दोन मोठे, तीन मध्यम व एकूण २४ लघू प्रकल्प असून हे सर्व प्रकल्प मिळून सध्या १०१. ८२ दलघमी म्हणजेच सरासरीच्या २९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

Water Stock
Dam Water Stock : धरणांत पाण्याची आवक सुरू

अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा व वाण हे दोन मोठे प्रकल्प आहेत. महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात २१.३७ दशलक्ष घनमीटर म्हणजे एकूण क्षमतेच्या २४.७५ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. वाणमध्ये सध्या २८.६० दलघमी म्हणजे ३४.८९ टक्के साठा आहे.

याशिवाय मोर्णा मध्यम प्रकल्पात ३७.६८ टक्के, निर्गुणा २२.५३ टक्के, तर उमा प्रकल्पात ९.४३ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील एकूण २४ लघू प्रकल्पांमध्ये ३०.२ टक्के जलसाठा आहे. याशिवाय बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा प्रकल्पात ५८.९९, अकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्पात ५०.४७ टक्के जलसाठा आहे.

काटेपूर्णा आणि वाण प्रकल्पांमध्ये आणखी एक महिना पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे. पाऊस आणखी लांबल्यास पाणीटंचाई उद्भवू शकते. जिल्ह्यात या आठवड्यात रविवारपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. तीन दिवस शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणाऱ्या पावसाने मंगळवारी सकाळनंतर विश्रांती घेतली.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ४६.७ मि.मी. म्हणजे ३३.९ टक्केच पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधित सरासरीच्या तुलनेत १०३.५ मि.मी. पाऊस जिल्ह्यात पडला होता. यंदा मात्र जूनमध्ये पाऊस न झाल्याने सार्वत्रिक पेरण्यांना सुरुवातही होऊ शकलेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com