Banana Seedling Agrowon
ताज्या बातम्या

Banana Seedling : केळी रोपांचा बियाणे कायद्यात समावेश करा

कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) केळी पिकाचे अतोनात नुकसान करीत आहे. शेतकऱ्यांची मोठी वित्तीय हानी यात झाली आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः कुकुंबर मोझॅक विषाणू (Banana Cucumber Mosaic) (सीएमव्ही) केळी पिकाचे अतोनात नुकसान (Banana Crop Damage) करीत आहे. शेतकऱ्यांची मोठी वित्तीय हानी यात झाली आहे. सीएमव्हीची समस्या उतिसंवर्धित केळी रोपांत (Banana Seedling) अधिक असते. ही बाब लक्षात घेता पंजाब राज्य शासनाच्या उतिसंवर्धित आधारित बियाणे बटाटा कायदा २०२० च्या धर्तीवर राज्यातही महाराष्ट्र उतिसंवर्धित आधारित बियाणे केळी कायदा (Seed Banana Act) लागू करावा.

यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीसंबंधी जबाबदारी निश्‍चित करण्यासह भरपाई मिळू शकेल, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व राज्य शासनाकडे केली. शेतकऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, सीएमव्हीमुळे केळीचे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. रोगग्रस्त झाडे उपटून फेकल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांना पुनर्लागवडीसाठी मदत करायला हवी.

त्यासाठी पंचनामे तातडीने करावेत. पंजाब राज्यातही बटाटा उत्पादकांना बटाटा रोपांत रोगराईची समस्या होती. तेथे शासनाने सर्वेक्षण करून उतिसंवर्धित आधारित बियाणे बटाटा कायदा लागू केला. राज्यातही शासनाने सर्वेक्षण करून आपला अहवाल सादर केला आहे. यात केळी रोपांत सीएमव्ही अधिक असल्याचे म्हटले आहे.

राज्यातही उतिसंवर्धित आधारित बियाणे केळी कायदा लागू करावा. बुरशीजन्य रोगांसंबंधी करपानिर्मूलन पॅकेज जाहीर करावे. यातच जळगाव जिल्ह्यात केळी पट्ट्यातील शेतरस्ते चांगले तयार करावेत.

यामुळे केळीची वाहतूक सुकर होऊन केळीची गुणवत्ताही ढासळणार नाही. जिल्ह्यातील कृषी यंत्रणांवर ताण येत आहे. यामुळे पुरेसे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत, असे शेतकरी अमोल पाटील (केऱ्हाळे, ता. रावेर), दिनेश गंभीर पाटील, संतोष महाजन आदींनी निवेदनात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT