Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीअभावी मदतच मिळेना

सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि मदतीचे प्रस्ताव सरकारकडे पाठवूनही केवळ मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक न झाल्याने शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

टीम अॅग्रोवन.

मुंबई : सततच्या पावसामुळे (Heavy Rain) झालेल्या नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) आणि मदतीचे प्रस्ताव सरकारकडे पाठवूनही केवळ मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक न झाल्याने शेतकरी मदतीपासून (Crop Damage Compensation) वंचित आहेत. त्यामुळे तातडीने बैठक घेऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे यांना वेळ नसल्याची टीका त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रानुसार, उस्मानाबाद जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील एकूण एक लाख ९९ हजार ९०७ शेतकऱ्यांचे एक लाख ६३ हजार ६९८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यासाठी २२२ कोटी, ७३ लाख रुपयांची आवश्यकता आहे.

मदतीचा २२२ कोटींचा प्रस्ताव प्रलंबित

जिल्हाधिकाऱ्यांनी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी २२२ कोटी, ७३ लाख एवढ्या रकमेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. हा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागास प्राप्त झाला. मात्र हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावास मंजुरीसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आवश्यक आहे.

मात्र ही बैठक अजून आयोजित केलेली नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीसाठी वेळ न दिल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब होत आहे. बैठक लवकर घेऊन या प्रस्तावास तत्काळ मंजुरी देऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी, असे पाटील पत्रात नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT