Crop Damage : नुकसानीबाबत साडेचार लाख दावे

जिल्ह्यातून ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने चार लाख ५८ हजार दावे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वच अर्जाचे पंचनामा झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली.
 Crop Damage
Crop DamageAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) खरीप पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी स्थानिक नेसर्गिक आपत्ती घटकांतर्गत पीक विमा कंपनीकडे वैयक्तीक दावे दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. यामुळे जिल्ह्यातून ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने चार लाख ५८ हजार दावे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वच अर्जाचे पंचनामा झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली.

 Crop Damage
Crop Insurance : पीक नुकसानीबाबत तीन लाख दावे दाखल

जिल्ह्यात जुले, ऑगस्ट तसेच सप्टेंबर व आक्टोबरमध्ये जोरदार पाऊस झाला. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागांत झाल्यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्यातील अनेक मंडलांत एकापेक्षा अधिकवेळा अतिवृष्टी नोंदली गेली. जोरदार झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. यात नदीकाढची पिके खरडून गेली. तर काही ठिकाणी पाणी साचून पिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीत जिल्ह्यातील सात लाखांपेक्षा अधीक शेतकऱ्यांच्या सव्वापाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने शासनाकडे पाठविली होती.

 Crop Damage
Crop Insurance : नुकसानीबाबत ७२ तासांच्या आत विमा कंपनीला पूर्वसूचना द्या

याबाबत शेतकऱ्यांना ७१७.८८ कोटींची भरपाई मंजूर झाल्याने ती वाटपाचे काम सुरू आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे वैयक्तीक दावे दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. यामुळे जिल्ह्यातून पोर्टलवर तीन लाख ७० हजार ४७८, ई-मेलद्वारे ३७ हजार ५८ तर टोलफ्री क्रमांकाच्या माध्यमातून ३८ हजार २२३, ऑफलाइन २७६ तर इतर ११ हजार ९९४ असे एकूण चार लाख ५८ हजार २९ दावे दाखल झाले आहेत. अर्ज आलेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली. या दाव्यानुसान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. कंपनीस्तरावरून अधिकारी याबाबत कार्यवाही करत आहेत.

तालुकानिहाय दाखल दावे
अर्धापूर १६,१०२, भोकर ११,९४५, बिलोली ३५,५२२, देगलूर ४१,३८०, धर्माबाद १४,८१०, हदगाव ४१,७३४, हिमायतनगर २३,५५३, कंधार ४८,२८१, किनवट २६,७३३, लोहा ३४,४७०, माहूर १२,२३६, मुदखेड १६,९४३, मुखेड ६६,९८२, नायगाव ३३,४५७, नांदेड १९,५९२, उमरी १४,२८९.

जिल्ह्यात स्थानिक नेसर्गिक आपत्ती घटकांतर्गत पाच लाख ५८ हजार दावे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वच दाव्यांचे पंचनामे विमा कंपनीकडून करण्यात आले आहेत.
- रवीशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com