Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या

मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

टीम ॲग्रोवन

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे (Monsoon Rain) शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Crop Damage) झाले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी दिले.

शिंदे म्हणाले, ‘‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामात विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा.’’

ओला दुष्काळ जाहीर करा ः राज ठाकरे

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. या पत्रानुसार, यंदा मॉन्सून हंगाम लांबला असून, परतीच्या पावसाने कहर केला आहे. परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अपरिमित नुकसान केले आहे. एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतही शेतकरी चिंतातूर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक वाया गेले आहे.

सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले, तरी प्रशासकीय पातळीवर ते नीट होत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे गरजू आणि गरीब शेतकरी वंचित राहतो. त्यामुळे हे पंचनामे नीट होतील याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. या नुकसानीचा आढावा युद्धपातळीवर घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT