Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain : कोल्हापूर जिल्ह्यास अतिवृष्टीचा तडाखा

रात्री अचानक आलेल्या जोरदार पावसाने खळबळ उडाली. अनेक शिवारे पुन्हा पाण्याखाली गेली.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर ः जिल्ह्यातील बहुतांश भागाला शुक्रवारी (ता. २१) रात्री पुन्हा एकदा पावसाने (Rain Update) झोडपले. विशेष करून करवीर, शिरोळ तालुक्यांत अतिवृष्टी (Heavy Rainfall) झाली. रात्री अचानक आलेल्या जोरदार पावसाने खळबळ उडाली. अनेक शिवारे पुन्हा पाण्याखाली गेली.

तब्बल दीड तास विजेच्या कडकडाटासह झाल्याने, शिरोळ तालुक्यात एकच दैना उडाली. उदगाव (ता. शिरोळ) येथे सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावर ओढ्याचे पाणी आल्याने महामार्ग बंद झाला.

त्याचबरोबर उदगाव-रेल्वे स्टेशन चिंचवड-शिरोळ, उदगाव-उमळवाड यासह तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्याचबरोबर जयसिंगपूर शहरात अनेक दुकाने, घरांत पाणी आल्याने खळबळ उडाली आहे.

दीड तासांत ११८ मिलिमीटर पाऊस पडल्याने शिरोळ, जयसिंगपूर, उदगाव, चिंचवड यासह परिसरात शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Commission Hike: केंद्राकडून अडते, सहकारी सोसायट्यांच्या कमिशनमध्ये वाढ

Gold Price: सोन्याचा दर पुन्हा वधारला; प्रती तोळा १ लाख ५८ हजारांच्या पार

Fertilizer Sales: खत विक्री पॉस मशिनद्वारेच करा

Agriculture Festival: परभणीत जिल्हास्तरीय कृषी महोत्सव सुरू

Farm Loan Waiver: कर्जाच्या पुनर्गठनामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभही मिळणार नाही का?

SCROLL FOR NEXT