नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain Nanded) एकूण सात लाख ४१ हजार शेतकऱ्यांच्या पाच लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रातील खरिपासह बागायती व फळपिकांचे (Kharif Crop Damage) ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यात बाधितांना ‘एनडीआरएफ’च्या नव्या निकषानुसार (दुप्पट भरपाई) जिल्हा प्रशासनाने ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. परंतु शासनाकडून अद्याप भरपाई (Compensation) मिळाली नसल्याने नुकसानग्रस्त प्रतीक्षेत आहेत.
नांदेड जिल्ह्यात यंदा जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन अनेक मंडळांत एकापेक्षा अधिकवेळा अतिवृष्टीची नोंद झाली होती. जुलैमध्ये तर एका महिन्यात विक्रमी ६०६ मिलिमीटर पाऊस होऊन पिकांची दाणादाण उडाली होती. अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन नदीकाठची जमीन खरडून गेली. सखल भागातील पिके पाण्याखाली गेली होती.
नांदेड जिल्ह्यात झालेल्या प्रचंड नैसर्गिक आपत्तीत जिरायतीमधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मूग या पाच लाख २७ हजार १४१ हेक्टरवरील जिरायती पिकांसह ३१४ हेक्टरवरील बागायती व ६६ हेक्टरवरील फळपिके असे एकूण पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. यात सात लाख ४१ हजार ९४६ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या नव्या निकषानुसार (दुप्पट भरपाई) जिल्ह्यासाठी ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. परंतु शासनाकडून निधी मिळाला नसल्यामुळे लाखो नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
तालुकानिहाय मागणी केलेला निधी (रुपयांत)
नांदेड २५,८९,५२,२००
अर्धापूर २९,१६,५२,०००
कंधार ५५,१२,६०,०००
लोहा ६१,०५,०४,०००
देगलूर ४२,९५,०४,८००
मुखेड ५४,७०,१९,२००
बिलोली ४०,३५,३९,२००
नायगाव ४१,०५,४७,०००
धर्माबाद २९,५३,९८,८००
उमरी ४०,११,३२,०००
भोकर ५२,४३,०७,२००
मुदखेड २४,२७,०५,६००
हदगाव ८५,२०,२८,०००
हिमायतनगर ४२,७४,०७,२००
किनवट ६७,०९,१५,२००
माहूर २२,२०,१९,२००
एकूण ७१७,८८,९१,६००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.