Crop Damage : वादळी पावसाचा पिकाला बसला फटका

Team Agrowon

गेल्या महिनाभरापासून खंड पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना चिंता लागली होती. त्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अंकुशनगर परिसरात शनिवारी (ता. ३) सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार (Heavy Rainfall With Wind) झालेल्या पावसामुळे परिसरातील कपाशी (Cotton), ऊस, बाजरी, कडूळ आडवे तर फळबागांमध्ये फळ गळ (Fruit Fall) मोठ्या प्रमाणात झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले.

अनेक ठिकाणी पोल पडले ,पत्रे उडून गेली, झाडे पडली, विद्युत तारेवर झाडे पडल्याने अनेक ठिकाणची वीज गुल झाली आहे.

या वादळी वाऱ्यामुळे ऊस कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले. मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. या वादळी वाऱ्यामुळे पिकांचे होत्याचे नव्हेत झाले आहे.

या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे व ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

वडीगोद्री : वडीगोद्रीसह अंतरवाली सराटी, धाकलगाव, पीठोरी सिरसगाव ( ता.अंबड) आदी ठिकाणी शनिवारी (ता.३) रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होता. शनिवार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या मध्ये पिकांना जीवदान मिळाले परंतु शेतातील ऊस, कापूस, आदी पिकांचे नुकसान झाले. ही पीक जमिनीवर आडवी झाली.

अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाली. वादळी वाऱ्यामुळे शेतातील उभ्या पिकांची दाणादाण झाली. शासनाने त्वरित पडलेल्या पिकांचे पंचनामे करावी असी मागणी शेतकरी बाबा दखणे यांनी तहसीलदार अंबड यांना केली आहे.

cta image