Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update : पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भात पावसाचा जोर

Team Agrowon

Pune News : मोठ्या प्रतीक्षेनंतर पुनरागमन झालेल्या पावसाचा जोर आता वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांत शनिवारी (ता. २३) अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी झाली.

नागपूर जिल्ह्यातील नागरधन, रामटेक येथे सर्वाधिक १९७.३ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले भरून वाहिल्याने अनेकांच्या शेतात पाणी शिरले. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळाला. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पाऊस पडला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. तर अनेक ठिकाणी तुरळक सरी बरसल्या.

पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिले. धोकादायक घरे आणि नदीकाठच्या वस्तीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी तत्काळ हलविण्याच्या सूचना दिल्या. पाण्याची पातळी वाढल्यास ‘एनडीआरएफ’च्या अतिरिक्त तुकड्यांची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

परभणी व हिंगोली जिल्ह्यांत शनिवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत ७२ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. गेल्या २४ तासांत परभणी जिल्ह्यात सरासरी ८.६ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी ९.१० मिलिमीटर पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील ४२ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला.

सातारा जिल्ह्यात माण, खटाव, कऱ्हाड, वाई तालुक्यांतील शेतकऱ्यांना पावसाने दिलासा दिला. या तालुक्यात शुक्रवारी (ता. २२) अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. शनिवारी कोरेगाव तालुक्यातील पिपोंड येथे दमदार पाऊस झाला. नगर जिल्ह्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाला. दुसऱ्या दिवशी सात महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सर्वदूर पावसाचे आगमन झाले.

अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले. ओढ्या- नाल्यांना पूर आले. त्यामध्ये नाशिक, सिन्नर व दिंडोरी तालुक्यांत तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. सिन्नर तालुक्यात नायगाव महसूल मंडलांत सर्वाधिक १५७ मिमी पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. खानदेशात पावसाच्या तुरळक सरी पडल्याने तूर, कापूस पिकांना काही प्रमाणात आधार मिळाला.

नागपुरात रस्त्यांना तलावाचे स्वरूप

विदर्भातील बुलडाणा, वर्धा जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी असला तरी पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विदर्भाला अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यातच शनिवारी पहाटे साडेपाच वाजेपर्यंतच्या गेल्या २४ तासांत नागपूर शहरात तब्बल ११६.५ मिलिमीटर पाऊस पडला.

ढगफुटीसदृ‍श बरसलेल्या या पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचले. रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले. अनेकांच्या घरांतही पाणी शिरले. नागपूर रेल्वे स्थानकही जलमय झाल्याने रेल्वे वाहतूकही प्रभावित झाली.

शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :

इगतपुरी ११७.५, नायगाव १५७.३, सुपा १०९.३, वळसंग १३६.५, नागपूर १६६, सीताबर्डी १६६, पार्डी १०३, हुडकेश्‍वर १०३, गोधनी

१११, कामठी १४६.५, कोराडी १११, दिघोरी १०३, देवळापूर, मुसेवाडी १०४.८, पाचगाव मळेवाडा १०३, कुही ११९.८, तितूर ११२ तुमसर ११६.५, शिवरा १२७, भंडारा १२८.८, देवडी ११६.५, कान्हान १४६.५.

शनिवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटर) : स्त्रोत ःकृषी विभाग ः

कोकण : नाटे ६६, भांबेड, विलवडे ५४. श्रावण ८७.३, आबेरी ५०.३, पोइप ४०, म्हापण ६९.५, वेतोरे ४४.५,

मध्य महाराष्ट्र : उंबरठाणा ७२.५, देवळाली ७९.३, सातपूर ५९.५, शिंदे ६९.३, माडसांगवी ५३.८, पाथर्डी ७०.५, निफाड ६०.५, ओझर ५९.५, नांदूर ६४.८, भाळवणी ६५.८, पळशी ९८.३, सात्रळ ८२.८, देवळाली ६६.५, साकूर ८३.३, अकोले ५३.८, अष्टापूर ५९.५, वडगाव भांडे ६४, खांडवी ५७.८, कुमठे ५७.५, मायणी ५६.३, बेडग ६३, नृसिंहवाडी ५३.८,

मराठवाडा : पिंपळवाडी ४५.३, धानोरा ४२.३, नांदूरघाट ६४.३, कासारशिरसी ६२.५, सिरजखोड ४०.३, परभणी ग्रामीण ५७.५, कात्नेश्‍वर ४५, कुपता ५२.८,

विदर्भ : चांदूरबिस्वा ४३.५, कन्नमवरग्राम २७, आमडी ९२.३, निमखेडा ८८, मौदा ५७, धानळा ५७, चाचेर ८८, मंधाळ ९६.३, पाचखेडी ९६.३, वेलतूर ७८, राजोली ७८, बेला ६६.५, खोकार्ला ७०.८, केरडी ७२.५, पारोळा ७०.३, मिटेवणी, गाऱ्हा ९०, अड्याळ ६८.३, बारव्हा ७०.८, मासाळ ५१.५, मुंडीकोटा ५६.८, मुल्ला, देवरी ५२, काकोडी ७८, बह्मपुरी, अन्हेर, चौगण, मेंढा ५२.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT