Nashik News : जुलै महिन्याच्या अखेरपासून जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस झालेला नाही. त्यामध्ये सिन्नरसारख्या तालुक्यात जवळपास ४० गावांमध्ये खरिपाचा पेरा नाही. तर जुलैमधील पावसाच्या ओलीवर झालेल्या पेरण्या फक्त नावापुरत्या शेतात उभ्या होत्या. अशा परिस्थितीत खरीप पूर्णपणे हातातून गेला. तर आता पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
अशा परिस्थितीत सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा हजेरी लागल्याने शेतकरी काहीसा सुखावला. शुक्रवारी (ता. २२) सकाळी ८ वाजेपर्यंत येवला तालुक्यात ६९.५ मिमी पावसाची नोंद झाली. पण दुपारनंतर तालुक्यात पाउस सुरु होता. तर अंदरसुल महसूल मंडलात १४० मिमी इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात येवला, नांदगाव, निफाड, चांदवड, मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा या तालुक्यांमध्ये खरिपाच्या पेरा झाला; मात्र ही पिके उभी करपून गेली.
त्यामुळे खरीप वाया गेला, मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याची परिस्थिती होती. अशातच मागील सप्ताहात जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे समाधानकारक वातावरण तयार झाले.
पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली होती. मात्र पूर्व भागातील तालुक्यात पावसाची प्रतीक्षा लागून होती. त्यातच येवला तालुक्यात ५ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
पावसाने दडी दिल्याने अक्षरशः जमिनीला भेगा पडल्या होत्या, तर पिके अक्षरशः करपून गेल्याची गंभीर स्थिती होती. आता या पावसाने पिकांना फायदा होणार नाही. मात्र जनावरांचा चाऱ्याचा व पिण्याचा प्रश्न सुटेल अशी भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.
नाशिक, दिंडोरी, मालेगाव, सटाणा, कळवण, नांदगाव, निफाड, सिन्नर, चांदवड, त्र्यंबकेश्वर व देवळा तालुक्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला. सुरगाणा तालुक्यांतील सुरगाणा व उंबरठाणा, तर इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी व धारगाव महसूल मंडलांत पावसाचा जोर दिसून आला.
येवला तालुक्यातील
या मंडलात अतिवृष्टी
मंडळ पाऊस(मिमी)
येवला ७७.८
नगरसुल ७५.८
अंदरसुल १४०.५
सावरगाव ६५.८
अंगणगाव १०६.८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.