Koyna Dam Agrowon
ताज्या बातम्या

Koyna Dam : कोयना धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस

Satara Rain Update : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झाला असून धरणात ३.८३ टीएमसी वाढ झाली असून धरण २९.५४ टक्के भरले आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यातील पश्चिम भागात दमदार पाऊस सुरू असून जिल्ह्यात २४ तासांत सरासरी २५.०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झाला असून धरणात ३.८३ टीएमसी वाढ झाली असून धरण २९.५४ टक्के भरले आहे.

मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील कोयना, केरा, उत्तर मांड, दक्षिण मांड, तारळी, मोरणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारी (ता. १८) दिवसभर मध्यम स्वरूपाचा संततधार पाऊस पडत होता. रात्री पावसाचा जोर वाढला. कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी दमदार पाऊस झाला.

धरण क्षेत्रातील कोयनानगर येथे १५८ मिलिमीटर, नवजाला ३०७ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला २३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या जलाशयात प्रति सेकंद ४४ हजार ३०५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणात २४ तासांत ३.८३ टीएमसी वाढ झाली असून धरणात एकूण ३१.१० टीएमसी म्हणजेच २९.५४ टक्के भरले आहे.

धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी या प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने याही प्रमुख धरणातही पाण्याची आवकेत वाढ होत आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावळी, पाटण सातारा या तालुक्यांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस सुरू झाला आहे.

कऱ्हाड, वाई, कोरेगाव या तालुक्यांत मध्यम, तर माण, खटाव, फलटण, खंडाळा तालुक्यांत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. गेले दीड महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पेरणी झालेल्या पिकांना या पावसामुळे जीवनदान मिळण्याबरोबर शिल्लक पेरण्या करण्यास पोषक वातावरण होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT