Koyna Dam : कोयना धरण परिसरात पावसाचा जोर; एका दिवसात दीड टीएमसीने वाढ

Satara Monsoon Update: सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढला असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक १५० मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरण पाणीसाठ्यात जवळपास दीड टीएमसीने वाढ झाली.
Koyna Dam
Koyna DamAgrowon
Published on
Updated on

Satara Rain Update : कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणात २४ तासांत १.३८ टीएमसीने वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. १८) सकाळी आठपर्यंत २५.९० टक्के धरणात पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.

Koyna Dam
Koyana Dam Satara : यंदा कोयना धरण १०० टक्के भरण्याची शाश्वती नाही, अत्यंत कमी पावसाची नोंद

जिल्ह्याच्या पूर्वकडील महाबळेश्वर, जावळी, पाटण, वाई तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. कऱ्हाड, कोरेगाव, माण, खटाव, फलटण, खंडाळा तालुक्यांत तुरळक पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी १२.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दमदार पाऊस येत नसल्यामुळे पेरणीची कामे संथगतीने सुरू आहेत. पश्चिमेकडील पाटण, जावळी, सातारा काही प्रमाणात भातलागणीची कामे सुरू आहेत. ऐन जुलैमध्ये कृषिपंपाद्वारे पाणी देण्याची कामे सुरू आहेत.

कोयना धरण क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर वाढला आहे. धरण क्षेत्रातील कोयना ७७, नवजा ९८ व महाबळेश्वर १५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात प्रति सेकंद १६०१८ क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणात २४ तासांत १.३८ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात सकाळी आठपर्यंत २७.२७ टीएमसी म्हणजेच २५.९० टक्के धरण भरले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com