Bhatghar Dam Agrowon
ताज्या बातम्या

Pune Rain Update : पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळत आहे. आठ दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे धबधबे ओसंडून वाहत असून ओढे, नाले भरून वाहत आहेत. धरणांतील पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील काही धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या वर गेला आहे. अशीच स्थिती पुढील काही दिवस राहिल्यास लवकरच धरणे भरतील अशी शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात १८ जुलैपासून पावसाने जोर धरला आहे. या काळात मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली या घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस कोसळला आहे. मागील सात दिवसांत जिल्ह्यातील २६ धरणांत नव्याने ४२.०८ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. जिल्ह्यातील धरणसाठा ७१.०४ टीएमसी एवढा झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे.

सोमवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये लोणावळा या घाटमाथ्यावर सर्वाधिक १५६ मिलिमीटर पाऊस पडला. तर, वळवण या घाटमाथ्यावर १०४ मिलिमीटर पाऊस पडला असून कुंडली ८४, शिरोटा ९३, मुळशी ८९, ठोकरवाडी ३५ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच काही धरणक्षेत्रांतही १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे धरणांत रविवार (ता. २३) सकाळपर्यंत नव्याने ५.७७ टीएमसी एवढी पाण्याची आवक झाली आहे.

मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या चारही धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस पडला. तर वरसगाव, पानशेत धरणक्षेत्रात १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे या धरणांत १.४६ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. तर, टेमघर धरण वगळता इतर धरणातील पाणीसाठा हा ५० टक्क्यांच्यावर गेला आहे. नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, कळमोडी, आंध्रा, वडिवळे, गुंजवणी, भाटघर,नीरा देवघर या धरणक्षेत्रांत जोरदार ते मुसळधार पाऊस पडला.

तर चासकमान, भामा आसखेड, शेटफळ, नाझरे, वीर या धरणक्षेत्रात हलक्या सरी पडल्या. या धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांत सर्वाधिक २.३० टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली. कुकडी खोऱ्यातील डिंभे धरणक्षेत्रात २० मिलिमीटर पाऊस पडला असून पिंपळगाव जोगे, येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड धरणक्षेत्रांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या.

त्यामुळे या धरणांत १.०५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली. विसापूर धरणक्षेत्रात ढगाळ वातावरण असून, उजनी या धरणक्षेत्रात तुरळक सरी पडल्या. परंतु जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात होत असलेल्या पावसामुळे उजनीत काही प्रमाणात आवक सुरू झाली होती.

सोमवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये धरणनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

पवना १०६, टेमघर ७०, वरसगाव १०५, पानशेत १०४, खडकवासला २५, कासारसाई ३०, कळमोडी ४९, चासकमान १८, भामा आसखेड १०, आंध्रा ४४, वडिवळे ८३, शेटफळ ३, गुंजवणी १०६, भाटघर २८, नीरा देवघर ९१, वीर ६, पिंपळगाव जोगे ११, माणिकडोह १२, येडगाव ६, वडज १०, डिंभे १०, चिल्हेवाडी १०, घोड ५, मुळशी ८९, उजनी १

मागील आठ दिवसांतील धरणसाठा (टीएमसीमध्ये)

तारीख -- नव्याने आलेला आवक

१८ जुलै -- २.६०

१९ जुलै -- ५.१०

२० जुलै --७.६९

२१ जुलै -- ६.९०

२२ जुलै -- ५.७७

२३ जुलै -- ६.५७

२४ जुलै -- ७.४५

एकूण -- ४२.०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT