Pune Dam Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांत दोन दिवसांत ७.७० टीएमसी पाण्याची आवक

Pune Dam Water Level: घाटमाथ्यावर मुसळधार, जिल्ह्यातील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस
Pune Dam
Pune Dam Agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune Dam Water Latest Update: पुणे : राज्यासह पुणे जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. विशेष म्हणजे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे नद्या, ओढे दुथडी भरून वाहू लागल्याने धरणांतील पाण्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

मागील दोन दिवसांत जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये तब्बल ७.७० टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठा ३६.६२ टीएमसीपर्यंत पोहचल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झाला आहे.

धरणक्षेत्रात मागील दोन दिवसांपासून चांगलाच जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी मंगळवारी (ता.१८) धरणात जवळपास २.६० टीएमसीपर्यंत आवक झाली. बुधवारी (ता.१९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ५.१० टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

त्यातच मागील पंधरा दिवसांत ही आवक अर्धा टीएमसीपर्यंत खाली आली होती. चालू वर्षी धरणे भरतील की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु धरणसाठा ३० टीएमसीच्या आतमध्येच होता. मात्र घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळल्याने दोन दिवसांत जवळपास पावणे आठ टीएमसीपर्यंत वाढ झाली आहे.

Pune Dam
Pune Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांत अवघा ३२ टीएमसी पाणीसाठा

जिल्ह्यात सोमवारपासून (ता. १७) पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यानंतर वळवण घाटमाथ्यावर सर्वाधिक २१२ मिलिमीटर पाऊस पडला. तर लोणावळा २०८ मिलिमीटर, कुंडली १६३, शिरोटा १३४, मुळशी ७६, ठोकरवाडी ४९ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे मुळशी, आंध्रा, वळवण, शिरवटा, लोणावळा धरणांत २.०७ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. सध्या मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत या धरणक्षेत्रांत मुसळधार पाऊस पडला असून खडकवासला धरणक्षेत्रात हलका पाऊस पडला.

त्यामुळे धरणांत १.१९ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. नीरा खोऱ्यातील पवना, कळमोडी, आंध्रा, वडीवळे गुंजवणी, नीरा देवघर या धरणक्षेत्रांत मध्यम ते जोरदार तर वीर, भाटघर, कासारसाई, चासकमान, भामा आसखेड, शेटफळ, नाझरे या धरणक्षेत्रांत हलका पाऊस पडला. त्यामुळे या धरणात १.७३ टीएमसी एवढ्या पाण्याची

Pune Dam
Dam Water Level : धरणांत ३० टीएमसी पाण्याची आवक

आवक झाली. कुकडी धरणक्षेत्रातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड, विसापूर, उजनी या धरणक्षेत्रांत हलक्या ते तुरळक सरी बरसल्या असून धरणांत ०.६३ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

धरणनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
वडिवळे १११, टेमघर ७०, वरसगाव ४७, पानशेत ४४, खडकवासला १०, पवना ९३, कासारसाई ७, कळमोडी ३७, चासकमान ७, भामा आसखेड १४, आंध्रा ३५, शेटफळ १०, नाझरे १, गुंजवणी ५९, भाटघर १९ निरा देवघर ५६, वीर २, पिंपळगाव जोगे १०, माणिकडोह १६, येडगाव ९, वडज ५, डिभे ९, चिल्हेवाडी १३, घोड १२, विसापूर ४, उजनी १०, मुळशी ७६


ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com