Parbhani News: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा, उन्हाळी भुईमूग या पिकांचा समावेश आहे. या योजनेतील सहभाग कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी असून ऐच्छिक आहे. कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत..विमा अर्ज सादर करण्यासाठी रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर, गहू (बागायती), हरभरा या पिकांसाठी १५ डिसेंबर तर भुईमुगासाठी ३१ मार्च २०२६ अंतिम मुदत आहे. या योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी) असणे अनिवार्य आहे..Crop Insurance Scheme : फळपिकांसाठी विमा योजना लागू, हेक्टरी रक्कम मिळणार इतकी, असा करा अर्ज.राज्य शासनाने कप अँड कॅप मॉडेलनुसार (८०-११०) बीड पॅटर्ननुसार राबविण्यास मान्यता दिली आहे. रब्बी अन्नधान्य व गळीतधान्य यासाठी शेतकरी विमा हप्तादर १.५ टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के आहे. पिकांचे उंबरठा उत्पादन हे सर्व पिकांसाठी त्या हंगामातील मागील ७ वर्षांपैकी सर्वाधिक उत्पदनाच्या ५ वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणीले त्या पिकाचा जोखीमस्तर असेल. .Kharif Crop Insurance : खरीप पीक विमा योजना सात पिकांना लागू.यंदा ज्वारी, गहू, हरभरा, भुईमूग पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. शेतकरी अर्ज, विमा हप्ता सामाईक सुविधा केंद्रामार्फत (सीएससी) ऑनलाइन पद्घतीने निःशुल्क भरू शकतात, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी सांगितले. माहितीसाठी भारतीय कृषी विमा कंपनीच्या pikvima@aicofindia.com या ई-मेलवर मेल करावा..पीकनिहाय प्रतिहेक्टरी जोखीम स्तर, विमा संरक्षित रक्कम, विमा हप्तापीकजोखीम स्तर (टक्के)विमा संरक्षित रक्कम (रुपये)विमा हप्ता (रुपये)ज्वारी७०३६०००३६०.००गहू७०४५०००३३७.५०हरभरा७०३६०००३६०.००भुईमूग७०४०६००१०१.५०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.