पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या ११ वर्षांत, देशाच्या संपूर्ण शेती क्षेत्रात मोठा बदल झाला आहे भारत नैसर्गिक शेतीचे जागतिक केंद्र बनण्याच्या मार्गावर आपली कृषी निर्यात जवळपास दुप्पट झाली नैसर्गिक शेती... हा भारताचा आपला स्वदेशी विचार .South India Natural Farming Summit 2025 PM Narendra Modi: आगामी वर्षात भारतीय शेतीमध्ये मोठे बदल घडताना दिसतील. भारत नैसर्गिक शेतीचे जागतिक केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. माझे शेतकऱ्यांना सांगणे आहे की, एक एकर, एका हंगामापासून सुरुवात करा. एका हंगामात एक एकर जमिनीवर नैसर्गिक शेती करून पाहा, असे आवाहन त्यांनी केले. ते बुधवारी तामिळनाडूच्या कोइम्बतूर येथील दक्षिण भारत नैसर्गिक शेती परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.."गेल्या ११ वर्षांत, देशाच्या संपूर्ण शेती क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. आपली कृषी निर्यात जवळपास दुप्पट झाली आहे. आपली जैवविविधता एक नवीन आकार घेत आहे. देशातील तरुण आता शेतीकडे एक आधुनिक, मोठी संधी म्हणून पाहत आहेत. यामुळे देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला खूप मोठी ताकद मिळणार आहे," असे पीएम मोदी म्हणाले..Natural Farming: जमीन सुपीकतेसाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची.नैसर्गिक शेती... हा भारताचा आपला स्वदेशी विचार आहे. आपण हा दुसऱ्या कुठूनही स्वीकारलेला नाही. तो आपल्या परंपरेतून जन्माला आला आहे. आपल्या पूर्वजांनी तपश्चर्या करुन तो तयार केला आहे. तो आपल्या पर्यावरणासाठी अनुकूल आहे. जर आपण 'श्री अन्न' म्हणजेच मिलेट्स उत्पादन नैसर्गिक शेतीशी जोडले तर ते जमीनच्या संरक्षणातही महत्त्वाची भूमिका बजावेल. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक शेतीला विज्ञानाशी आधारित चळवळ बनवावी लागेल. जेव्हा आपल्या शेतकऱ्यांचे पारंपारिक ज्ञान, विज्ञानाची ताकद आणि सरकारचा पाठिंबा... हे जेव्हा तिन्ही एकत्र जोडले जातील, तेव्हा शेतकरी समृद्ध होईल आणि आपली भूमातादेखील निरोगी राहील, असे त्यांनी सांगितले..Natural Farming: शाश्वत जीवनशैलीसाठी नैसर्गिक शेती आवश्यक.यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नैसर्गिक शेती प्रदर्शनाचेही उद्धघाटन केले. यादरम्यान त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला..१९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान होत असलेल्या दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेचे आयोजन तामिळनाडू नॅचरल फार्मिंग स्टेकहोल्डर्स फोरम यांच्या वतीने करण्यात आले आहे. शाश्वत, पर्यावरणपूरक आणि रसायनमुक्त शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्याचा या परिषदेचा उद्देश आहे. या परिषदेत तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील समारे ५० हजार शेतकरी, नैसर्गिक शेतीवर प्रयोग करणारे, शास्त्रज्ञ, सेंद्रिय निविष्ठा पुरवठादार, विक्रेते आणि भागधारक यांचा सहभाग आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.