Grape Production Agrowon
ताज्या बातम्या

Grape Production : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञ बना

डॉ. आर. जी. सोमकुंवर : सांगलीत द्राक्ष चर्चासत्र

टीम ॲग्रोवन

सांगली : द्राक्ष शेतीमध्ये (Grape Farming) मार्गदर्शन करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक (Grape Producers) शेतकऱ्यांच्या मध्ये द्विधा अवस्था निर्माण होत आहे. सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनीच स्वतः शास्त्रज्ञ बनून दर्जेदार द्राक्ष बनवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे,

असे मत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संशोधन केंद्रामधील शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी व्यक्त केले. येथील सांगली-कर्नाळ रस्त्यावरील राजपूत गार्डन द्राक्ष बागायतदार संघाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलत होते. या वेळी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संशोधन केंद्रामधील शास्त्रज्ञ डॉ. अजयकुमार उपाध्याय, डॉ. दीपेंद्र यादव, डॉ. एस. के. होळकर, दाभोलकर प्रयोग परिवाराचे समन्वयक वासुदेव काठे,

राज्य द्राक्ष संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, सुनील पवार, चंद्रकांत लांडगे, द्राक्ष संघ सांगली विभागाचे अध्यक्ष संजय बरगाले, राज्य द्राक्ष संघाचे माजी अध्यक्ष सुभाष आर्वे आदींसह जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

डॉ. आर. जी. सोमकुंवर म्हणाले, की द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. दर्जा म्हणजे काय असा प्रश्नही समोर येतोय. द्राक्ष विक्रीसाठी दर्जा ही पहिली गोष्ट आहे. त्यासाठी खरड छाटणीपासून काडी संख्या जाडी यास अन्य गोष्टी करण्यासाठी काटेकोर नियोजन केले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जोपर्यंत मुलीचे व्यवस्थापन नेटके होत नाही

तोपर्यंत द्राक्ष बाग चांगली उभी राहणार नाही. वेलींच्या अंतरानुसार घड ठेवले तर द्राक्षाचा दर्जा मिळेल. वासुदेव काठे म्हणाले, की टिकाऊ आणि दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन कसे करता येईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पान देठ परीक्षण करून काटेकोर व्यवस्थापन केले पाहिजे.

घडाची तपासणी करून छाटणीचे नियोजन करता आले पाहिजे. त्यासाठी काडी तपासणी केली तर घडांची संख्या कळू शकेल. द्राक्षाचे घड एकसारखे आणि मनांचा आकार सारखा राहण्यासाठी पानांची संख्या किती हवी याचेदेखील महत्त्व समजून घेतले पाहिजे.

अध्यक्ष शिवाजी पवार म्हणाले, की सांगलीला द्राक्ष पिकाचा वारसा आहे. त्यामुळे द्राक्ष संघ उभारणीसाठी सांगलीचा वाटा मोठा आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या कितीही संकट आली तरी तो तितक्याच जोमाने उत्पादन घेण्यासाठी माहीर आहे.

डॉ. अजयकुमार उपाध्याय, डॉ. दीपेंद्र यादव, डॉ. एस. के. होळकर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. संजय बरगाले यांनी प्रस्तावित केले. तर आभार प्रफुल्ल पाटील यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT