Grapes Production : कसमादे भागात पूर्वहंगामी द्राक्षाचे खुडे सुरू

उत्पादनात घट; मागणीमुळे मुहूर्ताला १५० रुपये दर
Grapes Production
Grapes ProductionAgrowon
Published on
Updated on

मुकुंद पिंगळे नाशिक : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेल्या चार वर्षांत कसमादे भागात पूर्वहंगामी द्राक्ष (Grapes Season) उत्पादन घेतले जात आहे. चालू वर्षीही अतिवृष्टी,(Wet Drought) हवामान बदलांमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसण्याची वेळ आली आहे. ‘अधिक जोखीम अधिक दर’ या प्रमाणे हा हंगाम असतो.

Grapes Production
Grape Export : द्राक्ष निर्यातदार अडचणीत

सटाणा तालुक्यात गुरुवारी (ता.२२) दुपारनंतर खुडे सुरू झाले आहेत. उत्पादनात घट आली असल्याने शिवार खरेदीत प्रतिकिलो १५० रुपयांचा दर मिळाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत २० रुपयांनी दरवाढ मिळाली आहे. नवरात्री सणाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर भारतात द्राक्षांना चांगली मागणी आहे. त्यामुळे सटाणा, मालेगाव, कळवण व देवळा तालुक्यांत शेतकरी जून महिन्यापासून गोडी बहर छाटणी घेत असतात. मात्र चालू वर्षी अतिवृष्टीचे संकट असल्याने हंगाम काहीसा प्रभावित झाला आहे.

Grapes Production
Grape Farming : सिंचनाच्या भक्कम पायावर मालगावात फुलल्या द्राक्ष बागा

अशा प्रतिकूल परिस्थितीत वाजगाव येथील शेतकरी चैत्राम पवार यांनी सोनाका वाणाचा माल तयार केला आहे. जून महिन्यात छाटणी करून उत्पादन हाती आले आहे. मागील वर्षीप्रमाणे चालू वर्षीही पहिल्या द्राक्ष खुड्याचा मान पवार यांनीच मिळविला आहे.

उत्तर भारतीय व्यापाऱ्यांनी मागील वर्षी १३० रुपये प्रतिकिलोने जागेवर शिवार खरेदी केली होती. तर चालू वर्षी याच व्यापाऱ्यांनी मालाला मागणी असल्याने १५० रुपये प्रतिकिलो प्रमाणे खरेदी केली आहे. मालाची उपलब्धता कमी असल्याने २० रुपयांची किलोमागे दरवाढ देण्यात आली आहे.

काढणीपश्‍चात कामकाज व व्यवहार :

पूर्वहंगामी मालाचे खुडे केल्यानंतर द्राक्ष माल काढणीपश्‍चात शेडमध्ये आणून हाताळणी व प्रतवारी करून घेतली जात आहे. बाजाराच्या मागणीनुसार अर्धा किलो वजनाचे १० पनेट ५ किलो वजनाच्या पेट्यांमध्ये भरून माल पाठवला जात आहे.

प्रतिपेटी ७५१ रुपये दर ठरविण्यात आला आहे. हा माल देशांतर्गत कानपूर (उत्तर प्रदेश) येथे पाठविला जात आहे. पहिल्या दिवशी दीड टन मालाचा खुडा झाला आहे. किलोमागे १० रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी चैत्राम पवार यांनी सांगितले

मागील वर्षी २८ जूनला, तर चालू वर्षी ११ जून रोजी गोडी बहर छाटणी केली. साडेचार एकर द्राक्ष बाग आहे. अडीच एकरांवर पूर्वहंगामी उत्पादन घेतो. त्यापैकी सव्वा एकरवर १०१ दिवसांचा तयार मालाची काढणी सुरू झाली आहे. उत्पादन घेताना अतिवृष्टीमुळे करपा, डाऊनीची समस्या असल्याने उत्पादनावर परिणाम आहे. तर दुसऱ्या टप्प्यात सव्वा एकरावर काढणी होईल. उर्वरित २ एकरवरचा निर्यातक्षम माल दिवाळीला काढला जाईल.

- चैत्राम पवार, द्राक्ष उत्पादक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com