Grampanchyat Election
Grampanchyat Election Agrowon
ताज्या बातम्या

Grampanchyat Election : ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल

Team Agrowon

सोलापूर : जिल्ह्यातील १७४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा (Grampanchyat Election) निकाल मंगळवारी (ता.२०) झाला. यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. मुख्यतः अनेक गावात परिवर्तन झाले. विशेषतः पंढरपूर तालुक्यातील तुंगत, उत्तर सोलापुरातील मार्डी, दक्षिण सोलापुरातील मंद्रूप या गावच्या निवडणुका विशेष लक्षवेधी ठरल्या.

सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाली. पण दुपारी बारापर्यंत निवडणुकीचे सर्व चित्र स्पष्ट झाले. विजयाची घोषणा होताच, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. बार्शी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी बेलगाव, गाडेगाव, देवगाव या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. १९ सरपंचपदासाठी १०० उमेदवार तर १६३ सदस्यपदासाठी ४७८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते, यापूर्वी ३१ सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. येथे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत व माजीमंत्री दिलीप सोपल यांच्या गटातील लढती रंगल्या.

उत्तर सोलापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात माजी आमदार दिलीप माने गटाने आठ ग्रामपंचायतीवर सरपंचपदाचे उमेदवार निवडून आणल्याचा दावा केला. मार्डी, डोणगाव अन्‌ कौठाळी या तीन ग्रामपंचायतींवर भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले तर एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच विजयी झाला. विशेष म्हणजे आदर्श गांव म्हणून नावारुपास आलेल्या कारंबा ग्रामपंचायतीत सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीचा धक्कादायक पराभव झाला. अक्कलकोट तालुक्यातील २० पैकी १२ ग्रामपंचायती व दक्षिण सोलापूरमधील ६ पैकी ४ ग्रामपंचायती अशा एकूण २६ पैकी १६ ग्रामपंचायती काँग्रेस पक्षाने जिंकल्याचा दावा माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला.

मोहोळ तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दहा पैकी चार ग्रामपंचायतींवर समविचारी आघाडीचे चार सरपंच निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे तीन, भाजपचे दोन तर पहिल्यांदाच शिंदे गटाने खाते उघडले आहे. एकंदरीत १० ग्रामपंचायतीपैकी सात ग्रामपंचायतीवर विरोधी गटाचे सरपंच विराजमान झाले आहेत. त्यात महिला कारभारी पाच आहेत. पंढरपूर तालुक्यातील ११ पैकी ७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी पुरस्कृत विठ्ठल परिवाराने झेंडा फडकवला आहे. उर्वरित ४ ग्रामपंचायतीवर परिचारक गटाला सत्ता मिळाली आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या तुंगत ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे. येथे काँग्रेसचे नेते प्रकाश पाटील यांच्या गटाने सत्ता खेचून आणली आहे. मंगळवेढा तालुक्यात आमदार समाधान आवताडे गटाने १० ग्रामपंचायतींवर, तर भालके गट व परिचारक गटाच्या समविचारी गटाने ११, तर सिद्धेश्वर आवताडे गटाने चार ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे.

सरपंचपदी मुलगा, सदस्यपदी आई

सांगोला तालुक्यातील झालेल्या सहा ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये चार ग्रामपंचायतींवर आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील गटाने सरपंचपदी वर्चस्व मिळवले. तर शेकाप पक्षाने दोन गावातील गड कायम राखले आहेत. शिवणे येथील सरपंचपदी दादासो घाडगे हे विजयी झाले. तर त्यांच्या आई कुसुम घाडगे या सदस्यपदी निवडून आल्या आहेत. त्यामुळे आई व मुलगा एकाच ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्यपदी निवडून आल्याची घटना घडली आहे.

------------------------

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT