Grampanchyat Election : सोलापुरातील १७४ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी रंगली

चौदाशेवर सदस्यांसाठी होणार मतदान; १५ सरपंच बिनविरोध
 Grampanchyat Election
Grampanchyat ElectionAgrowon

सोलापूर ः जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत नऊ तालुक्यांतील १५ ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. आता उर्वरित गावांच्या निवडणुकीसाठी गावपातळीवर विविध गट, पक्ष आणि स्थानिक आघाड्यांमध्ये प्रचाराची रंगत चांगलीच वाढली आहे. येत्या रविवारी (ता. १८) या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.

 Grampanchyat Election
सहकारी संस्था निवडणुकांची उद्यापासून रणधुमाळी

ऑक्टोबर ते डिसेंबर २२ या कालावधीत मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार पाच डिसेंबरला अर्जांची छाननी झाली आणि सात डिसेंबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाले. .

काही गावांत भावकी-भावकीत, काही ठिकाणी पारंपरिक विरोधक तर काही ठिकाणी नवीन-तरुण आघाड्यांमध्ये लढती लागल्या आहेत. प्रत्येकजण आपली बाजू भक्कम कशी आहे, हे मांडत आहेत. जिल्ह्यातील १५ गावच्या सरपंचांच्या निवडी या आधीच बिनविरोध झाल्या आहेत. आता ११ तालुक्यांत १७४ गावांमध्ये सरपंचपदाची, तर १ हजार ४१८ ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. ‘होम टू होम’ प्रचारासह निवडणुकीत होत असल्याचे दिसते.

या ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध

करमाळा तालुक्यातील अंजनडोह, वंजारवाडी, लिंबेवाडी, माढा तालुक्यांतील शिंगेवाडी, बार्शी तालुक्यांतील बेलगाव, देगाव, गाडेगाव, मोहोळ तालुक्यांतील अर्धनारी, पंढरपुरातील सुगाव खुर्द, माळशिरसमधील नेवरे, सांगोल्यातील चिणके, पाचेगाव खुर्द, मंगळवेढा तालुक्यांतील रहाटेवाडी, फटेवाडी, दक्षिण सोलापुरातील दर्गनहळळी या गावांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com