Pune Maize Production Agrowon
ताज्या बातम्या

Maize Sowing : शेतकऱ्यांची मका पिकाला पसंती

रब्बी हंगामात चारा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. त्यामुळे मका पिकांच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. पुणे विभागात आतापर्यंत एक लाख १० हजार १७३ हेक्टरवर चारा पिके घेतली आहेत.

Team Agrowon

Pune News: रब्बी हंगामात चारा पिकांची (Fodder Crop) मोठ्या प्रमाणात पेरणी (Sowing) केली आहे. त्यामुळे मका पिकांच्या (Maize Sowing) क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. पुणे विभागात आतापर्यंत एक लाख १० हजार १७३ हेक्टरवर चारा पिके घेतली आहेत.

येत्या काळात जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होणार असून फेब्रुवारी, मार्च महिन्यांत चाराटंचाई फारशी भासणार नसल्याचे चित्र आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांशी शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. त्यामुळे अनेक शेतकरी गाई, म्हशी, बैल अशा जनावरांचे संगोपन करतात.

जनावरांसाठी चारा वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून अनेक शेतकरी हिरवा चाऱ्यासाठी मका, कडवळ, बाजरीची पेरणी तर नेपिअर ग्रास, लुसर्नग्रास अशा विविध चारा पिकांची लागवड करतात. त्यामुळे जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतो.

मागील काही वर्षभरात दुग्ध उत्पादनात मोठी उलाढाल झालेली आहे. त्यामध्ये दुधाला बऱ्यापैकी मिळत असलेला बाजारभाव आणि विविध तालुक्यांतील प्रत्येक गावामध्ये विविध डेअरी उद्योगाच्या माध्यमातून दुग्धपूरक उद्योग वाढीस लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादन व्यवसायात मोठी संधी चालून आली आहे.

त्याचा आर्थिक फायदा होत आहे. मका पिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे दूध उत्पादनात वाढ होऊन दुधाची फॅट ही गुणवत्ता चांगली येते. त्यासोबतच मक्याच्या चाऱ्याचा वापर करून मुरघास मोठ्या प्रमाणात केला जातो.

उन्हाळ्यात सुद्धा ओल्या चाऱ्याची उपलब्धता मुरघासामुळे जनावरांना होते. त्यामुळे उन्हाळा असला तरीही जनावरांच्या दुग्ध उत्पादनात कोणताही बदल होत नसल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक नफा मिळतो.

पुणे विभागासह राज्यात गायी, म्हशी, शेळ्या, कालवडी, बैल यांची जवळपास तीन ते----साडे कोटी जनावरांची संख्या आहे. मागील काही वर्षांपूर्वी चारा टंचाईमुळे जनावरासाठी चारा छावण्या सुरू करण्याची वेळ शासनावर आली होती.

त्यामुळे पुन्हा तशीच स्थिती उद्‌भवू नये, म्हणून शेतकरी पुढाकार घेत चारा पिकांचे नियोजन करत आहे. त्यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना मका पिकांसारख्या चारा पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येते.

त्याचा फायदा बहुतांशी शेतकरी घेत चारा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चारा पिकांचे उत्पादन मिळते.

दाणाच्या उत्पादनासाठी मक्याची लागवड :

पुणे परिसरातील अनेक शेतकरी मक्याचे दाणे काढण्यासाठी मोठ्या आकाराच्या कणसाच्या मक्याची लागवड करतात. त्यासाठी किमान तीन ते चार महिने लागतात.

मक्याचे कणसे काढणीच्या अवस्थेत आल्यानंतर फक्त कणसे काढून कंपनीला, मार्केटमध्ये विकतात. त्यातून चांगले उत्पादन मिळत असल्याने अनेक शेतकरी याकडे वळत आहेत. त्यामुळे मका लागवडीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते.

पुणे विभागात मका पिकाची झालेली लागवड (हेक्टरमध्ये)

जिल्हा --- सरासरी क्षेत्र --- लागवड झालेले क्षेत्र--- टक्के

नगर -- ८६,४०५ -- १,१५,६२७ -- १३४

पुणे -- ३९,८०३ -- ४३,६३७ -- ११०

सोलापूर --- ४२, ५८८ -- ६३,४११ -- १४९

एकूण -- ६७,५५८ --- १,१०,१७३ -- १६३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT