Garlic Prices Hike : मागच्या दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्याच्या स्वयंपाकातील भाजीतून टोमॅटो गायब झाला होता. दरम्यान आता कांदा आणि लसूणचे दर वाढणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. उत्तम प्रतिचा कांदा सध्या २५ ते ३० रूपये किलो भावाने जात असला आहे. तर भारतातील काही शहरांत लसूण दराने चांगलाच भाव घेतला आहे. प्रतिकिलो १८० रुपयांपर्यंत लसूणला दर मिळत आहे.
पाटण्यात किंमत १७२ रुपये इतकी आहे, तर कोलकात्यात हाच दर १७८ रुपयांपर्यंत पोहचला आहे. महाराष्ट्रात लसूणला प्रतिकिलो ११० ते १६० रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान मागच्या ४ महिन्यात लसणाचे दर डबल झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान २०२२ मध्ये घाऊक बाजारात लसूण अगदी कवडीमोल भावात विकला गेला होता. मध्य प्रदेशातील कृषी उत्पन्न बाजारात शेतकऱ्यांचा लसूण ५ ते ८ रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्यात आला होता.
चांगले भाव मिळत नसल्याने नाराज झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी पिकवलेला लसूण रस्त्यात फेकून दिला होता. उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले होते.
यंदा घाऊक बाजारात शेतकऱ्यांचा लसूण १५० रुपये प्रतिकिलो दराने विकत घेतला जात आहे. त्यामुळे शेतकरी खुश असला तरी यानंतर किरकोळ बाजारात पोहोचणारा लसूण चांगलाच महागलेला दिसतो. मागच्या अनुभवामुळे अनेक शेतकऱ्यांनी लसूण पिकविण्याचे प्रमाण यंदा निम्म्यावर आणले आहे.
देशाच्या एकूण लसूण उत्पन्नात एकट्या मध्य प्रदेशचा वाटा ६२.८५ टक्के इतका असतो. मध्य प्रदेशातून दक्षिण भारतातील राज्ये, महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांना लसूण पुरवला जातो. त्यामुळे मध्य प्रदेशातील लसूण महागताच इतर राज्यांतील दरही कडाडू लागतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.