Gadchiroli News: गडचिरोली तालुक्यातील वसा हे गाव विविध उपक्रम राबवण्यात आघाडीवर असून या गावात नेहमी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. हे अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी येथे केले..मुंबई येथील स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने वसा गावातील गुरुदेव सेवा मंडळाला रुग्णवाहिका भेट देण्यात आली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण डॉ. बंग यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर होते. .Rural Development: ग्रामविकासातील अडचणी सोडवा.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राणी बंग, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक माजी संघटन मंत्री रवी भुसारी, आरोग्य सेवा विभागाचे माजी उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. प्रशांत पेंदाम, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. बाळू सहारे, डॉ. अनंता कुंभारे, डॉ. सुनील मडावी, डॉ. अजय कासर्लावार, डॉ. स्मिता साळवे, केशवराव दशमुखे, रामकृष्ण ताजणे, सरपंच मुखरू झोडगे, संजय बर्वे, राम भुसारी, रमाकांत भुसारी आदी उपस्थित होते..Rural Development: वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसाठी सौंदाळा गावचा नावलौकीक.या वेळी डॉ. बंग म्हणाले, ‘‘सेवेचा संकल्प आणि तुकडोजी महाराजांचा वारसा या गावाला लाभला असून वसा हे गाव इतर गावांसाठी प्रेरणास्थान आहे. आज या गावात रुग्णवाहिकेचे लोकार्पण होत आहे. ही कौतुकास्पद बाब असून आरोग्य हीच खरी संपत्ती असून या रुग्णवाहिकेचा उपयोग या परिसरातील जनतेला होईल. यातून अनेकांना फायदा होणार असून स्वामी समर्थ परिवाराने यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे.’’ या वेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, डॉ. राणी बंग यांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले..डॉ. शंभरकर म्हणाले, ‘‘रुग्णवाहिकेची गावातील नागरिकांसाठी नितांत आवश्यकता आहे. या रुग्णवाहिकेमुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकतील. असे कल्याणकारी उपक्रम राबविणे गरजेचे आहे.’’.प्रास्ताविक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक माजी संघटन मंत्री रवी भुसारी यांनी केले. सूत्रसंचालन शंकर इंगळे व चंद्रहास भुसारी यांनी केले, तर आभार पोलिस पाटील मुरारी दहिकर यांनी मानले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिकेची चावी चालक सुनील शिवणकर यांना देण्यात आली. गुरुदेव सेवा मंडळ वसाचे अध्यक्ष दुधराम डोर्लीकर, सचिव संतोष भोयर व अनेक गुरुदेव भक्तांनी सहकार्य केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.