Agriculture Protest : ‘‘आतापर्यंत ऊस पिकासाठी सातत्याने संघर्ष केला. रस्त्यावर व न्यायालयीन लढाई जिंकली. कारखानदारांना वठणीवर आणत २५० ते ३०० रुपये दर वाढवण्यात यश आले. उसाची लढाई जिंकली आहे. आता काटामारी, रिकव्हरी चोरीसह आले व हळद पिकासाठी संघर्ष करणार आहे,’’ असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले..येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उसाला वाढीव दर मिळवून दिल्याबद्दल शेट्टी आणि पाणी संघर्ष समितीचे प्रमुख डी. एस. देशमुख यांनी टेंभू योजनेची परिसरातील १५ कोटींची विविध कामे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडून मंजूर करून घेतल्याबद्दल नागरिकांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. .Turmeric Crop Loss: देशातील हळदीला पावसाचे ग्रहण.त्या वेळी श्री. शेट्टी बोलत होते. ‘स्वाभिमानी’चे राज्य प्रवक्ते अनिल पवार, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार, संजय तडसरे, संतोष डांगे, आनंदराव रासकर उपस्थित होते..Ginger Crop Disease : आले पिकामध्ये कंदकुज, करप्याचा प्रादुर्भाव .शेट्टी म्हणाले, ‘‘कारखानदार उसाला ३२०० रुपयांवर दर द्यायला तयार नव्हते. आम्ही ३५०० ते ३६०० रुपयांपुढे दर द्यायला भाग पाडले. आता ज्या कारखानदारांनी एकरकमी एफआरपी अद्याप दिली नाही, त्यांनी तातडीने द्यावी, अन्यथा फरकासह रक्कम त्यांनी द्यावी लागेल. एफआरपीचे तुकडे करणाऱ्या कारखानदारांविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत.’’.ते म्हणाले, ‘‘आले पिकाची जून आणि नवीन प्रतवारी करायची नाही, याबाबतचे शासनाला परिपत्रक काढायला लावले. परिपत्रक असूनही व्यापारी प्रतवारी करीत शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. हे खपवून घेणार नाही. आले व्यापाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत.’’.सत्यभान जाधव, जीवन करकटे, संजय तडसरे यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष डांगे यांनी प्रास्ताविक केले. ‘स्वाभिमानी’चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ नेते युनूस पटेल, सुनील गाढवे, बजरंग आडसूळ, शिवलिंग सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.