Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्या व मानव यांच्यातील वाढता संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचे पाऊल उचलले आहे. वन विभाग व पुण्यातील ‘डीएडीए (दादा) रिसर्च फाउंडेशन’ संचलित ‘डावेल लाइफसायन्सेस’ यांनी संयुक्तपणे ‘एआय वाईल्ड नेत्र’ ही स्वदेशी ‘इंटेलिजंट सर्व्हेलन्स सिस्टीम’ (एआय) यंत्रणा विकसित केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर कामरगाव (ता. अहिल्यानगर) येथे ही सौर ऊर्जेवरील अत्याधुनिक सायरन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे बिबट्याचा वावर लक्षात येताच गावकऱ्यांना तत्काळ सावध करणे शक्य होणार आहे..अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील सुमारे वीसपेक्षा अधिक जिल्ह्यांत बिबट्याचा वावर आहे. पशुधनासह माणसांवरही हल्ले होत असल्याने वन विभाग आणि शेतकरी, नागरिकही त्रस्त आहेत. अहिल्यानगर, पुणे, नाशिक भागांत बिबट्याचा अधिक वापर असून मानव-बिबट्याचा वाढता संघर्ष कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी गस्त घालणे किंवा पिंजरे लावणे या पारंपरिक उपायांच्या पलीकडे जाऊन उपाययोजना करण्यासाठी अहिल्यानगर वन विभागाने ‘एआय वाईल्ड नेत्र’ ही सौरऊर्जेवरील अत्याधुनिक सायरन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. .Wildlife Safety: बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सव्वा आठ कोटी रूपये.या यंत्रणेमुळे बिबट्याचा वावर लक्षात येताच गावकऱ्यांना तत्काळ सावध करण्याचे काम ही यंत्रणा करेल. या प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात वापरलेले प्रगत ‘कॉम्प्युटर व्हिजन’ व ‘डीप लर्निंग अल्गोरिदम’ हे आहे. सामान्य सेन्सर अनेकदा वाऱ्यामुळे हलणारी पिके किंवा कुत्र्यांच्या हालचालींवरही आवाज करू लागतात. मात्र, ‘एआय वाईल्ड नेत्र’मधील अल्गोरिदम भारतीय बिबट्याच्या शरीररचनेवर विशेषत्वाने प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ बिबट्याची ओळख पटल्यावरच ही यंत्रणा कार्यान्वित होते व अचूक विश्लेषण करते..Farmer Safety: वीजपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी.बिबट्याप्रवण क्षेत्रे अनेकदा दुर्गम भागात असतात, जिथे मोबाइल नेटवर्क नसते. अशा वेळी इंटरनेटवर अवलंबून असलेल्या यंत्रणा कुचकामी ठरतात. यावर मात करण्यासाठी यात ‘एज कम्प्युटिंग’ तंत्रज्ञान वापरले आहे. बिबट्या दिसल्यावर तत्काळ सायरन वाजतो. नेटवर्क नसल्यानेही प्रतिसादात कोणताही विलंब होत नाही..उच्च क्षमतेचे सौर पॅनेल्स व प्रगत बॅटरी व्यवस्थापन प्रणालीमुळे ही यंत्रणा चोवीस तास कार्यरत राहते. ऊस शेती व पावसाळी वातावरणात टिकून राहण्यासाठी ही यंत्रणा मजबूत बनवली असून, ती गरजेनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येते. हा प्रकल्प सध्या ‘प्रायोगिक तत्त्वावर कामरगाव (ता. अहिल्यानगर) येथे उभारली आहे. लोकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सूचना, अभिप्राय वन विभागाकडे नोंदवावेत, असे आवाहन विभागाने केले आहे. पुढच्या काळात नागरिकांना थेट व्हॉट्सॲपवर अलर्ट व ‘एसओएस’ मेसेजची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विभागाचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले..बिबट्या-मानव संघर्ष व्यवस्थापनात आपण आता प्रतिक्रियात्मक भूमिकेतून प्रतिबंधात्मक भूमिकेकडे जात आहोत. नागरिकांना सुरक्षित वातावरणात राहता यावे, यासाठी वन विभाग काम करत आहे. प्रगत एआय तंत्रज्ञानामुळे केवळ सायरन वाजत नाही, तर आपल्याला बिबट्यांच्या वर्तणुकीचा अचूक डेटाही मिळेल.- धर्मवीर साळविठ्ठल, उपवनसंरक्षक, अहिल्यानगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.