Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Khandesh Rain Update : खानदेशात सलग चार दिवस पाऊस

खानदेशात सलग चार दिवस पाऊस व पिकहानी झाली आहे. काही भागात हलकी गारपीटदेखील झाली असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Team Agrowon

Jalgaon News खानदेशात सलग चार दिवस पाऊस व पिकहानी (Crop Damage) झाली आहे. काही भागात हलकी गारपीटदेखील (Hailstorm) झाली असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पीक पंचनामे सुरू झाले आहेत. पण पाऊस व नुकसान सुरूच असल्याने नुकसानीसंबंधीची आकडेवारी वाढत आहे.

जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर या भागत पिकहानी अधिक झाली आहे. जामनेरातील उत्तर व पूर्व भागाला फटका बसला आहे. मका, ज्वारी आदी पिके आडवी झाली आहेत.

गुरूवार (ता.६) पासून ते रविवारपर्यंत (ता. ९) पाऊस झाला आहे. वडेल (ता. धुळे) शेतशिवारात रविवारी गारांचा पाऊस सायंकाळी झाला. हरभऱ्याच्या आकाराची गार या भागात पडली.

कांद्याचे नुकसान यात झाले आहे. तिसगाव, ढंढाणे, रामनगर व हनुमंतवाडी भागातही पाऊस व हलकी गार पडली. गारा फक्त काही सेकंद पडल्या. पाऊसदेखील मध्यम होता. नगाव, देवभाणे, धमाणे व कापडणे भागात तुरळक पाऊस झाला.

धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा, वरूळ-घुसरे, परसामळ, भडणे, हातनूर, अलाणे, दरखेडा, चिमठाणे, साळवे, दलवाडे (प्र. सोनगीर) वर्शी आदी परिसरात सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता.

त्यात अचानक मोठ्या प्रमाणात वादळ सुरू होऊन विजेच्या कडकडाटासह तुरळक पावसाला सुरवात झाली. त्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, मका, कांदा, दादर, रब्बी ज्वारी कापणीला व काहींची काढणी सुरू होती.

त्यात अचानक आलेल्या वादळाने व पावसाने शेतकऱ्यांसह मजुरांची तारांबळ उडाली. वादळामुळे केळी व पपईचे झाड उन्मळून पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

शिंदखेडा तहसील मंडळातील शनिवारी (ता. ८) सकाळी सातपर्यंत झालेला पाऊस, त्यात शिंदखेडा मंडळ सहा मिलिमीटर, चिमठाणे मंडळ पाच मिलिमीटर व वर्शी मंडळ चार मिलिमीटर अशी एकूण १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तालुक्यात १५ दिवसांपूर्वी अवकाळी व वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. मात्र त्या वेळीही पंचनामे झाले नाहीत. आता तरी महसूल विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील तोंडापूर व परिसरात सुमारे ४०० हेक्टरवरील मका व इतर पिके भुईसपाट झाली आहे. त्याचे पंचनामे सुरू असून, मंगळवारी (ता.११) अंतिम अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Pik Pahani : खरीप २०२५ च्या ऑफलाईन पीक पाहणीसाठी समिती गठीत; शासन निर्णय जारी

Nagpur Winter Session: छावणीच्या थकित बिलाबाबत सरकारची ‘तारीख पे तारीख’

Nagzari Rehabilitation: नागझरीचे पुनर्वसन अडकले लालफितीत

Lift Irrigation Scheme: सांगोला तालुक्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजना

Rabi Sowing: तीन जिल्ह्यांत हरभरा जास्त, तर ज्वारीची पेरणी कमी

SCROLL FOR NEXT