Jalgaon Dairy Scam Agrowon
ताज्या बातम्या

Jalgaon Dairy Scam : अखाद्य तूप गैरव्यवहार प्रकरणात ‘अन्न व औषध’प्रशासनाची एन्ट्री

जळगाव जिल्‍हा दूध उत्पादक संघातील अखाद्य (बी ग्रेडच्या) तूप विक्री प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभाग सक्रिय झाला आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव : जिल्‍हा दूध उत्पादक संघातील (Jalgaon Dairy) अखाद्य (बी ग्रेडच्या) तूप विक्री प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभाग (Food And Drug Department) सक्रिय झाला आहे. अखाद्य तूपापासून बाय-प्रॉडक्ट (Ghee By Product) तयार करण्याचे अधिकार दूध संघाला नाहीत, तरीही दूध संघातील ‘मस्तवालांनी’ चॉकलेट फॅक्टरीला अखाद्य (मानवी आरोग्यास अपायकारक) विकल्याचे आढळल्यानंतर जागे झालेल्या स्थानिक अन्न व औषध प्रशासनाने रेकॉर्ड तपासणीसाठी दूध संघात धडक दिली.

मात्र, पोलिसांनी रेकॉर्ड सील केल्याने त्यांना खाली हात परतावे लागले. जर राज्य शासनाची निष्पक्षपाती कारवाईची मानसिकता असेल, तर केंद्रीय एफडीए अन् एफडीए यांच्यात समन्वय घडवून या गुन्ह्याला निर्णयापर्यंत नेत दोषींना शिक्षा होऊ शकते. जिल्हा दूध संघातील एक हजार ८०० किलो अखाद्य (बी ग्रेड) तूप चॉकलेट कंपनीस विकून गैरव्यवहार केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

पोलिस तपासात संशयित रवी अग्रवाल कैलादेवी कुटिरोद्योग नावाने ‘राजेमलाई’ चॉकलेटचा उत्पादक वितरक आहे. संशयित मनोज लिमये, हरी पाटील आणि रवी अग्रवाल यांनी विठ्ठल-रुक्मिणी एजन्सी स्थापन करून अखाद्य तुपाची विल्हेवाट लावली.

हे तूप मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे माहीत असूनही त्याचा वापर चॉकलेट बनविण्यासाठी केला. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू होता. रवी अग्रवाल याच्या अकोला येथील कार्यालयाच्या झाडाझडतीत पोलिसांना तब्बल साडेचार हजार किलो तुपाचे ऑनलाइन ट्रान्झेक्शन झालेली कागदपत्रे सापडली.

ऑगस्टमध्ये जळगावच्या अनिल अग्रवाल आणि रवी अग्रवाल यांनी तूप खरेदी केले. परंतु दूध संघातून एकाचेच वाहन बाहेर पडल्याची नोंद आहे. त्यामुळे दुसऱ्याचा माल कोठून व कोणत्या वाहनातून गेला?, हे स्पष्ट होत नाही. पोलिसांनी या प्रकरणी संपूर्ण पाळेमुळे खोदायला सुरुवात केली आहे.

तपासात आढळली आणखी एक ‘एन्ट्री’

अकोल्यातून रवी अग्रवालच्या तब्बल साडेचार हजार किलो तुपाचे ऑनलाइन ट्रान्झक्शन झालेली कागदपत्रे सापडली. परंतु त्याने काही माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली. शनिवारी (ता. १८) पोलिसांना रवी अग्रवाल आणि त्याच्या वडिलांची एक ‘एन्ट्री’ सापडल्याची माहिती समोर आली आहे. मूळ फिर्यादीप्रमाणे एक हजार ८०० किलो तूप, प्रतिकिलो ८५ रुपये किमतीप्रमाणे भाव खरेदी केला जात होता. मात्र, त्याची विक्री १०० प्रमाणे केली जात होती. थोडक्यात, एका किलोमागे १५ रुपये नफा कमावला जात होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT