समरजितसिंह घाटगे म्हणाले, अदृश्य शक्तीचा हात राहिला तर युती कायम टिकेलआम्ही एकत्र आलेलो आहे ते कायम एकत्र राहण्यासाठी, हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वाससत्तेसाठी नाही, तर कागलच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र आल्याचे स्पष्ट.Kolhapur Politics Hasan Mushrif and Samarjeetsinh Ghatge Alliance: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नंतर आता कागलमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. कागल नगरपरिषदेचा (Kagal Nagar Parishad Election) फॉर्म्युला हा वरिष्ठ पातळीवर ठरला आहे. अदृश्य शक्तीचा हात राहिला तर युती कायम टिकेल, असे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्ट केले. तर आम्ही एकत्र आलेलो आहे ते कायम एकत्र राहण्यासाठी, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. आज मंगळवारी (दि.१८) राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडीची संयुक्त परिषद झाली. त्यात मुश्रीफ आणि घाटगे यांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केली..समरजितसिंह घाटगे म्हणाले की, आघाडी करण्यासाठी शरद पवार यांच्याकडून परवानगी घेतली होती. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी स्वायत्ता आम्हाला दिली आहे. जशी चंदगडमध्ये स्वायत्ता होती तशी इथे स्वायत्त आहे. ही युती अजित पवार गट आणि शाहू आघाडी यांच्यात आहे. राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. ती आता आली आहे. कागल, मुरगूडच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहे..Sanjay Mandlik Kolhapur: मुश्रीफांचा पहिल्यापासूनच डाव, लोकसभेला मला या दोघांनी फसवलं, संजय मंडलिकांचा आरोप.एकत्र येण्याने कोणत्याही कार्यकर्त्यांची गैरसोय होणार नाही. सगळ्यांना आम्ही न्याय देऊ. सगळ्यांनी एकत्र काम करण्याचे ठरविले आहे. या गोष्टीकडे बघून आपण पुढे गेले पाहिजेत. आमच्यात समन्वय चांगला आहे. सत्तेसाठी नाही, तर कागलच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यामुळे संघर्ष मिटेल, असे घाटगे म्हणाले..Kolhapur Politics: कागलच्या राजकारणाला कलाटणी, कट्टर विरोधक हसन मुश्रीफ- समरजितसिंह घाटगे एकत्र, युतीची घोषणा.मंडलिक अस्वस्थ, मुश्रीफ काय म्हणाले? विकासासाठी चांगले काम करु. आम्ही एकत्र आल्याने मंडलिक यांनी अस्वस्थ होण्याची काही गरज नाही, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला..विधानसभा निवडणुकीच्या कागल मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी ११ हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी मिळवला होता. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवलेले समरजितसिंह घाटगे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर विरोधक होते. विधानसभा निवडणुकीनंतर एक वर्षाने दोन्ही नेते एकत्र आले आहेत. यामुळे कागलमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक एकाकी पडले आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.