Jalgaon Dairy Election : उमेदवारीसंबंधीची खडसेंची याचिका फेटाळाली

जिल्हा दूध संघाच्या संचालकपद निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननीही झाली आहे. संचालकांच्या २० जागांसाठी मतदान होणार आहे.
Eknath Khadse
Eknath KhadseAgrowon
Published on
Updated on

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गट व महाविकास आघाडी यांच्यात जोरदार चुरस आहे. मुक्ताईनगर तालुक्यात सभासद नसताना भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केली आहे. ती उमेदवारी रद्द करावी, यासाठी मंदाकिनी खडसे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र ती याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली. यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे.

Eknath Khadse
Jalgaon District Milk Producers Union : दूध संघाच्या कार्यकारी संचालका विरुद्ध पुन्हा तक्रार

जिल्हा दूध संघाच्या संचालकपद निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननीही झाली आहे. संचालकांच्या २० जागांसाठी मतदान होणार आहे. छाननीत एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे जगदीश बढे रावेर तालुक्यातून बिनविरोध निवडून आल्याने त्यांच्या पॅनेलचा श्रीगणेशा झाला आहे.

Eknath Khadse
Jalgaon Dairy Election : खडसेंच्या नेतृत्वाखाली ‘मविआ’ लढणार

एकनाथ खडसे यांच्या पत्नी व संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार चव्हाण यांच्या अर्जावर मंदाकिनी खडसे यांनी हरकत घेऊन औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

त्यात म्हटले होते, की ज्या तालुक्याचा मतदार आहे, त्याच तालुक्यात त्यांना उमेदवारी दाखल करता येते. मात्र आमदार चव्हाण यांनी या नियमाचे उल्लंघन केले आहे. ते चाळीसगाव तालुक्यात सभासद आहेत. मात्र त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती. खंडपीठात या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी मंदाकिनी खडसे यांची याचिका फेटाळून आमदार चव्हाण यांची उमेदवारी मुक्ताईनगरातून ग्राह्य ठरविली.

उमेदवारी कायम ठेवणार : आमदार चव्हाण

आमदार चव्हाण म्हणाले, की न्यायदेवतेने आपल्याला न्याय दिला आहे. जिल्ह दूध संघात इतर गटातून सर्व उमेदवारांनी माघार घेतली व त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली, तरी आपण मुक्ताईनगरातून माघार घेणार नाही. आपण या मतदारसंघातून उमेदवारी कायम ठेवून निवडणूक लढणार आहोत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com