Jalgaon Dairy : कार्यकारी संचालक लिमये यांच्यासह चौघांना अटक

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघातील लोणी, दूधभुकटी आणि तूप चोरीबाबत शहर पोलिसांत दाखल गुन्ह्यात पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांनी अटकसत्र राबविले.
Milk Union Elections
Milk Union Elections Agrowon

जळगाव : जळगाव जिल्हा दूध उत्पादक (Jalgaon Dairy) संघातील लोणी, दूधभुकटी (Milk Powder) आणि तूप (Ghee) चोरीबाबत शहर पोलिसांत दाखल गुन्ह्यात पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांनी अटकसत्र राबविले. सकाळपासून या गुन्ह्याशी संबंधितांची मॅरेथॉन चौकशी करून अखेर रात्री उशिरा कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली.

Milk Union Elections
Jalgaon Milk Association : दूध संघ निवडणुकीत नियमांची पायमल्ली

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ११ ऑक्टोबरला अपहाराबाबत तक्रारी अर्ज दिला. त्यानंतर कार्यकारी अधिकारी मनोज लिमये चोरीची तक्रार घेऊन धडकले होते. मात्र लिमये यांची तक्रार घेण्याऐवजी मागील गुन्ह्यातच त्यांचा जबाब नोंदवून घेतला होता. परिणामी दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह राष्ट्रवादी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलनही केले होते.

Milk Union Elections
Jalgaon Dairy Election : महाजन, पाटलांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनल

दरम्यान, या प्रकरणी प्राप्त तक्रारी अर्जाचे चौकशी अधिकारी म्हणून सरकार पक्षातर्फे सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांचीच फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंदवून घेतला नाही म्हणून खडसे यांच्यातर्फे जिल्‍हा न्यायालयात दाद मागण्यात आली होती. न्यायालयाने त्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

लिमये यांनी या प्रकरणात ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले, त्यांच्या निलंबन आदेशात अपहार नमूद केल्याचे म्हटले आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन पोलिसांनी दूध संघाची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दूध संघातील जबाबदार संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. जिल्‍हा दूध संघात सध्या निवडणुकांचे वातावरण तापले आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी अटकसत्र राबविल्याने याचा स्पष्ट परिणाम संघाच्या निवडणुकांवर जाणवणार असल्याची स्थिती आहे.

...या चौघांना अटक

पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांनी दूध संघातील कर्मचारी- अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण केले. चौकशी अंती दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज गोपाळ लिमये (वय ५९), हरी रामू पाटील (वय ६७), किशोर काशिनाथ पाटील (वय ५७), अनिल हरी शंकर अग्रवाल (वय ५९) या चौघांना रात्री अटक केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com