Solapur News: ऊसदराच्या मागणीसाठी गादेगाव येथे झालेल्या ऊस परिषदेतून ऊसदर समितीने साखर कारखानदारांना आणि सरकारला तीव्र इशारा दिला. “येणाऱ्या चार दिवसांत सर्व साखर कारखान्यांनी ऊसाची पहिली उचल ३५०० रुपये जाहीर करावी, अन्यथा २१ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील उसाची वाहतूक रोखली जाईल. तसेच पालकमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही,” असा इशारा समितीने परिषदेच्या ठरावातून दिला..जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन जवळपास महिना उलटूनही अजून कोणत्याही कारखान्याने पहिली उचल जाहीर केली नसल्याचा मुद्दा परिषदेत मांडण्यात आला. यावेळी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे दीपक भोसले म्हणाले, “कारखाने सुरू होऊन महिना उलटला तरी ऊसदराची कोंडी कायम आहे. ३५०० रुपयांची उचल जाहीर न झाल्यास वाहतूक थांबवून तीव्र आंदोलन करू.”.Sugarcane Rate Protest: ऊसदरावरुन राजू शेट्टी करणार कारखानदारांची कोंडी, पहिली उचल ३,४०० ते ३,४५० रुपये मान्य नाही.‘स्वाभिमानी’चे सचिन पाटील, प्रा. सुहास पाटील, समाधान फाटे, नवनाथ माने, रणजित बागल, धोंडिराम घोलप, तानाजी बागल, निवास नागणे यांनीही यावेळी जोरदार टीका केली. गादेगावमधील या परिषदेला ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सभेत ठराव मंजूर झाल्यानंतर येत्या काही दिवसांत ऊसदराच्या प्रश्नावरून जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत..Sugarcane Payment: उसाला पहिली उचल ३५०० रुपये जाहीर करा.समितीच्या प्रमुख मागण्यापहिली उचल ३,५०० तातडीने जाहीर करावी.कार्यक्षेत्रातील अंतरानुसार वाहतूक दर निश्चित करावेत.दोन कारखान्यांतील २५ किमी हवाई अंतराची अट रद्द करावी..साखरेची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ४,५०० करावी.टोळी मुकादमांनी फसवणूक केलेल्या रकमा मुंडे महामंडळामार्फत वाहनमालकांना द्याव्यात.भंडीशेगाव मंडलाचा अतिवृष्टीपीडित क्षेत्रात समावेश करून नुकसानभरपाई द्यावी.सरकारने दिलेले आश्वासन पाळून सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.