Mosambi Agrowon
ताज्या बातम्या

Mosambi : पाणीताण तोडणीसाठी आंबवणी फायदेशीर ः डॉ. संजय पाटील

मोसंबी फळपिकाच्या आंबिया बहराचा ताण तोडल्यानंतर बागांना भरपूर फुलधारणा होण्यासाठी पहिले पाणी आंबवणी देणे फायदेशीर ठरते, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद ः मोसंबी फळपिकाच्या (Mosambi Crop Insurance) आंबिया बहराचा ताण तोडल्यानंतर बागांना (Mosambi Orchard) भरपूर फुलधारणा होण्यासाठी पहिले पाणी आंबवणी देणे फायदेशीर ठरते, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे (Mosambi Research Center) प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

एमजीएम कृषी विज्ञान केंद्र-२ यांनी बुधवारी (ता. २१) आयोजित केलेल्या मोसंबी बहर कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर एमजीएमचे संचालक सुदाम पवार, वरिष्ठ क्षेत्रीय अधिकारी शरद आगलावे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक काकासाहेब सुकासे, प्रगतिशील शेतकरी दादासाहेब शिंदे, स्वप्नील वाघ आदींची उपस्थिती होती.

या वेळी डॉ. पाटील म्हणाले, की सद्यःस्थितीत विविध संजीवकांचे मोसंबी झाडांमध्ये योग्य संतुलन झाल्याने मोसंबी झाडांना चांगला ताण बसला असून, जवळपास १५-२० टक्के पानगळ झालेली आहे, अशावेळी आंतरमशागतीची कामे आटोपून घ्यावी.

झाडावरील सल काढून बोर्डोची फवारणी करून, शिफारशीत खत मात्रेचा डोस देऊन पहिले हलके पाणी देऊन ताण तोडणे फायदेशीर राहील. या कार्यक्रमासाठी गोविंद वाघ, बाळासाहेब जीवरग, रमेश पाचलेगावकर, गणेश जाधव, दादासाहेब नवले, सुवर्णा जोशी आदी मोसंबी उत्पादकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काकासाहेब सुकासे यांनी केले. तर शरद अवचट यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Sugarcane Protest: कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊस आंदोलन पेटले, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Sugarcane Crushing Season: ‘द्वारकाधीश’चे ६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Rabi Sowing: अहिल्यानगरमध्ये रब्बी पेरणी दहा टक्के

Cotton Procurement: शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा

Poultry Exports: पोल्ट्री निर्यातीत दुपटीने वाढ, भारतीय अंड्यांना जगभरातून मोठी मागणी, युएई ठरला सर्वात मोठा खरेदीदार

SCROLL FOR NEXT