Beekeeping  Agrowon
ताज्या बातम्या

Beekeeping : ‘आग्या मधमाशीविषयीची भीती काढून टाकायला हवी’

Honey Bee : आग्या मधमशीविषयी लोकांच्या मनात अकारण गैरसमज व भीती आहे. मात्र या मधमाशीचे महत्त्व व उपयुक्तता याबाबत अधिकाधिक प्रसार करून ही भीती दूर करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली.

Team Agrowon

Pune News : आग्या मधमशीविषयी लोकांच्या मनात अकारण गैरसमज व भीती आहे. मात्र या मधमाशीचे महत्त्व व उपयुक्तता याबाबत अधिकाधिक प्रसार करून ही भीती दूर करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ मधमाशीपालन शास्त्रज्ञ कै. डी. बी. महिंद्रे यांच्या मूळ इंग्रजीतील व मराठी अनुवादित ‘आग्या मधमाश्‍यांचे सुलभ पालन व व्यवस्थापन’ पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (ता. २४) प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने पुणे येथे झाले.

‘बायफ’ संस्थेचे सल्लागार- विश्‍वस्त गिरीश सोहनी यांच्या हस्ते व ‘ॲग्रोटेक पब्लिकेशन’चे प्रकाशक डॉ. वि. सु, बावसकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. धनंजय वाखले, ज्येष्ठ संशोधक व पुस्तकाचे अनुवादक डॉ. क. कृ. क्षीरसागर, केंद्रीय मधमाशी संशोधन केंद्राचे सहायक संचालक सुनील पोखरे आदी उपस्थित होते. ‘इन्स्पायर्ड लाइफ’ संस्थेचे संस्थापक श्रीकांत सोमण ऑनलाइन उपस्थित होते.

श्री. सोहोनी म्हणाले, ‘‘आग्या मधमाश्‍या पाळीव नाहीत. परंतु योग्य पद्धतीने त्यांचे व्यवस्थापन करता येते. परागीभवनात त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. मात्र कीटकनाशकांच्या वापरामुळे त्यांचा नाश होत आहे.’’

डॉ. वाखले म्हणाले, ‘‘आग्या मधमाशीविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. शाळा, महाविद्यालये, शेतकरी आदींपर्यंत प्रशिक्षणे व अभ्यासक्रमाद्वारे या मधमाशीची उपयुक्तता व महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे.’’ डॉ. क्षीरसागर व डॉ. बावसकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

ज्योती भक्त म्हणाल्या, ‘‘इंग्रजी पुस्तकातील ज्ञान मराठी भाषेतून सर्वांपर्यंत पोहोचावे ही वडिलांची इच्छा होती. पुस्तकाच्या रूपाने ती पूर्ण झाल्याचे समाधान आहे.’’ रेवती सौदीकर यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT