Team Agrowon
हवा, पाणी, जमिनीतून, फुलपाखरू, पक्ष्यांमार्फत परागीभवन होत असते. या सर्वांपेक्षा मधमाश्यांकडून परागीभवनाचा वेग अधिक असल्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते.
मधमाश्यांची खूप मोठी भूमिका या अन्नसाखळीमध्ये आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण घटक मधमाशी आहे.
मधमाश्यांचं एक पोळ नष्ट झालं, तर एक गाव नष्ट झाल्यासारखं असतं. मधमाशी जगली नाही, तर आपल्याला अन्न मिळणार नाही.
विविध आजारांवर मध दिला जातो. मधामुळे हिमोग्लोबिन वाढते. मध हा आरोग्यवर्धक आहे.
परसबागेतून आपल्याला मिरची, कोथिंबीर, टोमॅटो असा भाजीपालाही करता येतो. परसबागेत एखादी मधपेटीही ठेवू शकतो.
मधमाश्यापालन व्यवसायातून फक्त मधच नाही तर मेण, रोन्दल, परागकण हेही मिळते.