Team Agrowon
अल्बर्ट आइन्स्टाईन हे शास्त्रज्ञ म्हणाले होते, की मधमाशी जेव्हा पृथ्वीतलावरून नष्ट होईल तेव्हा माणसांचे अस्तित्व ४-५ वर्षांत संपुष्टात येईल. म्हणजे मानव जात टिकून राहण्यासाठी मधमाशीपालन करणे किती गरजेचे आहे, हे आपल्या लक्षात आले असेल.
सगळ्या कीटकांमध्ये सगळ्यात वेगाने परागीभवन करणारा कीटक मधमाशी आहे.
मधमाश्यांची खूप मोठी भूमिका या अन्नसाखळीमध्ये आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण घटक मधमाशी आहे.
मधमाश्यांचं एक पोळ नष्ट झालं, तर एक गाव नष्ट झाल्यासारखं असतं. मधमाशी जगली नाही, तर आपल्याला अन्न मिळणार नाही.
हवा, पाणी, जमिनीतून, फुलपाखरू, पक्ष्यांमार्फत परागीभवन होत असते. या सर्वांपेक्षा मधमाश्यांकडून परागीभवनाचा वेग अधिक असल्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते.
मधमाश्यांचं एक पोळ नष्ट झालं, तर एक गाव नष्ट झाल्यासारखं असतं.
मधमाशीपालनातून फक्त मधच नाही तर मेण, रोन्दल, परागकण हेही मिळते. मधापासून अनेक चांगले पदार्थही बनवले जातात.