अमरावती ः अप्पर वर्धा धरणाचे १३ दरवाजे एकाचवेळी उघडण्यात येतात. त्यामुळे धरणाखालील (Dam) शेती पाण्याखाली येत पिकांचे नुकसान (Crop Damage) होते. पिकांची नुकसान भरपाई (Crop Damage Compensation) तसेच या शेतीचे भूसंपादन (Agriculture Land Acquisition) करावे, अशी २००७ पासून शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र शासनस्तरावरून याला प्रतिसाद मिळत नसल्याने या विरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दिला आहे.
तालुक्यातील सिंभोरा, भांबोरा व येवती या गावातील शेतकऱ्यांना अप्पर वर्धा प्रकल्पातून विसर्ग होणाऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका बसतो. यावर्षी देखील प्रकल्पाचे १३ दरवाजे उघडण्यात आले. परिणामी शेतात पाणी साचल्याने पिके उध्वस्त झाली. वर्धा नदीकाठावर चारघड नदीच्या संगमामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. यावर्षी सिंभोरा, भांबोरा व येवती येथील शेतकऱ्यांनी १०० एकरावर पेरणी केली. परंतु संततधार पाऊस व प्रकल्पातून होणारा विसर्ग यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पीक लागले नाही. शेतीचे सातत्याने होणारे नुकसान मानवनिर्मित आहे.
प्रकल्पाचे मुख्य अभियंता, उपविभागीय अभियंता यांना याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रफुल्ल उमरकर, मिलिंद उमरकर, संजय आपकाजे, आशा नांदणे, जयदेव नांदणे, अवधूत माहूरे, गुंफाबाई गडलींग, छत्रपती गडलींग, रमेश देवताडे, पुरुषोत्तम देवताडे, बाबूराव उमरकर, प्रल्हाद देवताडे, किशोर उमरकर आदींचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.