Onion Market  Agrowon
ताज्या बातम्या

Onion Market : कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Onion Rate : राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार १ फेब्रुवारी ते ३१ मार्चदरम्यान विक्री झालेल्या लेट खरीप कांद्याला प्रतिक्विंटल ३५० रुपये प्रति शेतकरी २०० क्विंटल मर्यादित अनुदान मिळणार आहे.

Team Agrowon

Onion Market Update नाशिक :राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार १ फेब्रुवारी ते ३१ मार्चदरम्यान विक्री झालेल्या लेट खरीप कांद्याला (onion Subsidy) प्रतिक्विंटल ३५० रुपये प्रति शेतकरी २०० क्विंटल मर्यादित अनुदान मिळणार आहे.

त्यासाठी मंगळवार(ता.२८) पासून बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याचे दिसून आले. अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता.३१) शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी बाजारात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

जानेवारीच्या अखेरपासून तर मार्चअखेर लेट खरीप कांद्याच्या दरात अपेक्षित सुधारणा दिसून आलेली नाही. उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.

त्यातच जिल्ह्यात वादळी वारे, गारपीट झाल्याने लेट खरीप कांद्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे काढलेला कांदा विक्री करून अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला, चांदवड, नांदगाव, उमराणे येथे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी गर्दी केली.

सरासरी ६५० ते १००० रुपये दर

रामनवमीच्या दिवशी काही बाजार समितीचे कामकाज बंद होते. तर मार्च अखेर सर्वच बाजार समिती कांदा लिलाव सुरू ठेवले होते. शुक्रवारी (ता.३१) सरासरी ६५० ते १००० रुपयांपर्यंत दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT