डॉ. सोमिनाथ घोळवे
कांद्याच्या प्रकिया उद्योगातून बनवलेले पदार्थ, कांदा मशालाचे पदार्थ, कांदा तेल, कांदा ज्यूस, कांदा चकल्या, कांदा वेपर्स, कांदा पावडर, कांद्याचे लोणचे हे सर्व पदार्थ बनवले जातात.
कांद्याचे दर घसरले तरी या पदार्थाचे दर घसरत नाहीत. या पदार्थाच्या किंमती स्थिर राहतात. मात्र शेतकऱ्यांना जेव्हा कांदा विकायचा असतो, तेव्हाच कांद्याचे दर का घसरतात?
या सर्व प्रकियेत फक्त कांदा उत्पादक शेतकरीच का भरडला जात आहे? शेतमाल विक्री व्यवस्था सक्षम का नाही.?
उत्पादन वाढ आणि आवक याच नावाखाली कांद्याच्या भावात प्रचंड घसरण व्यापारी, दलाल आणि उद्योजक घटकांकडून का केली जात आहे?.
अनुदान देण्याशिवाय शासकीय यंत्रणा या संदर्भात काहीच भूमिका घेऊ शकत नाही का?
शासनाकडून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका शासनाकडून का घेतली जात नाही. असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे येतात. या सर्व प्रश्नांची समीक्षा-चिकित्सा होणे आवश्यक आहे. तसेच सोशल ऑडिट देखील होणे गरजेचे आहे.