Nagar Rain Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : नगर जिल्ह्याला पावसाची आस; शेतकरी चिंताग्रस्त

Latest Rain Update : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत एखाद्या ठिकाणचा अपवाद वगळता कुठेही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत एखाद्या ठिकाणचा अपवाद वगळता कुठेही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. विशेष म्हणजे घाटमाथ्यावरील पाऊसही कमी झाल्याने भंडारदरा धरणातून सुरू असलेला विसर्ग थांबविला आहे. बुधवारी (ता .२०) रात्री नेवासा तालुक्यातील काही भागात हलकासा पाऊस झाला.

पावसाळ्याचे सुमारे तीन महिने उलटून गेले असले तरी अजूनही जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस नाही. विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच अकोले तालुक्यातील पश्चिम भागातही दरवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस आहे.

दरवर्षी सप्टेंबरमध्ये भंडारदरा, मुळा आणि निळवंडे धरण १०० टक्के भरलेले असते. यंदा भंडारदरा १०० टक्के भरले असले तरी मुळा धरण तसेच निळवंडे धरण पाऊस नसल्यामुळे अजूनही २० टक्के रिकामे आहे.

खरिपाची बहुतांश पिके वाया

जिल्ह्यातील धरणे रिकामी असल्याने जायकवाडीला नगर जिल्ह्यातून पाणी गेले नाही. दोन दिवसांपासून वातावरणात बदल झालेला असून राज्यातील काही भागात चांगला पाऊस पडत आहे. नगर जिल्ह्यात मात्र अकोले तालुक्यातील पश्चिम भाग वगळता अन्य ठिकाणी पाऊस नाही.

पश्चिम भागातही नेहमीच्या तुलनेत कमी पाऊस आहे. त्यामुळे खरिपाची बहुतांशी पिके वाया गेली आहेत. किमान भरतीचा पाऊस पडून रब्बीला तरी आधार मिळेल, अशी आशा आहे. पोळ्यानंतर परतीचा पाऊस सुरू होतो. यंदा मात्र पोळा होऊन चार दिवस झाले तरीही परतीचा पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. रब्बी हंगामही धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT