Pune Rain Update : पुणे विभागात सव्वातीन महिन्यांत ५८ टक्के पाऊस

Pune Rain News : पावसाचे जवळपास सव्वातीन महिने होत आले आहेत. या कालावधीत कमी-अधिक पाऊस पडला आहे. काही ठिकाणी अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही.
Pune Rain
Pune RainAgrowon

Pune Weather Update : पावसाचे जवळपास सव्वातीन महिने होत आले आहेत. या कालावधीत कमी-अधिक पाऊस पडला आहे. काही ठिकाणी अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही. आतापर्यंत पुणे विभागात सरासरीच्या ८३६.३ मिलिमीटरपैकी ४९२.६ मिलिमीटर म्हणजेच अवघा ५८ टक्के पाऊस पडला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा जूनच्या २३ तारखेपर्यंत अनेक भागांत पाऊस पडलेला नव्हता. त्यानंतर २४ जूनपासून पावसास सुरुवात झाली. आठवडाभर चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. पुन्हा पावसाने उघडीप दिल्यानंतर १८ जुलैपासून पुन्हा पावसास सुरुवात झाली.

३१ जुलैपर्यंत पावसाने अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. ऑगस्टमध्ये पावसाचा चांगलाच खंड पडला होता. एक सप्टेंबर रोजी सायंकाळपासून पुन्हा पावसास सुरुवात झाली. दोन सप्टेंबरपर्यंत बऱ्यापैकी पाऊस पडला. त्यानंतर आठ सप्टेंबरच्या दरम्यानही कमी-अधिक पाऊस पडला.

Pune Rain
Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात पावसामुळे दिलासा

यंदा जून महिन्यात पुणे विभागात सरासरीच्या १९८.६ मिलिमीटरपैकी ६८.४ मिलिमीटर म्हणजेच अवघा ३४ टक्के पाऊस पडला. यात कोल्हापूर जिल्ह्यात अवघा २५ टक्के, सांगलीत २७ टक्के, सोलापूरमध्ये २८ टक्के पाऊस पडला होता.

जुलै महिन्यात सरासरीच्या ३२७.२ मिलिमीटरपैकी ३०४.३ मिलिमीटर म्हणजेच ९३ टक्के पाऊस पडला. त्या वेळी सोलापूर, सांगली जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अधिक असले तरी पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण हे शंभर टक्क्यांपेक्षा कमी होते.

ऑगस्टमध्ये २४७.५ मिलिमीटरपैकी ७०.४ मिलिमीटर म्हणजेच अवघा २८ टक्के पाऊस पडला. यात सोलापूर जिल्ह्यांत अवघा १८ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली असून, पुणे जिल्ह्यांत ३९ टक्के, सातारा ३५ टक्के, सांगली २९, कोल्हापूर २७ टक्के पाऊस पडला.

सप्टेंबरमध्येही पावसाचे प्रमाण कमी आहे. एक ते ११ सप्टेंबर या कालावधीत विभागात सरासरीच्या ६३ मिलिमीटरपैकी ४९.५ मिलिमीटर म्हणजेच ७८ टक्के पाऊस पडला. यात सातारा जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस पडला आहे.

Pune Rain
Pune Rain Update : सात धरणांतून विसर्ग

उर्वरित जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. एकंदरीत आतापर्यंत झालेल्या पावसामध्ये पश्‍चिम पट्ट्यात आणि घाटमाथ्यावरही पावसाने चांगलेच थैमान घातले होते. त्यामुळे अनेक धरणे शंभर टक्क्यांपर्यंत भरली होती. परंतु काही धरणक्षेत्रात पावसाचे कमी प्रमाण राहिल्याने ५० ते ९० टक्के भरली असून, काही धरणांत अजूनही

पुरेसा पाणीसाठा झालेला नाही.

पुणे विभागात एक जून ते ११ सप्टेंबर या कालावधीत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये

जिल्हा --- सरासरी -- पडलेला पाऊस -- टक्के

पुणे -- ७६२.५ -- ५१५.४ -- ६७

सोलापूर -- ३६९.४ -- २८२.५ -- ७६

सातारा -- ७८४.८ -- ५०८.६ -- ६४

सांगली --- ४२६.७ --- २८८.२ -- ६७

कोल्हापूर -- १६०७.२ -- ८७७.५ -- ५४

एकूण -- ८३६.३ -- ४९२.६ -- ५८

(स्रोत : कृषी विभाग)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com